मूर्ती विटंबनेवरून बोरीअरब येथे तणाव
By Admin | Updated: September 7, 2014 00:10 IST2014-09-07T00:10:59+5:302014-09-07T00:10:59+5:30
बोरी (बु) येथील काळा मारूती मूर्ती विटंबनेच्या घटनेने येथे तणाव निर्माण झाला. निषेध सभा घेऊन बाजारपेठ बंद करण्यात आली. दरम्यान या प्रकरणी मारूती लक्ष्मण जाधव (३५) रा. बोरी बु. याला अटक करण्यात आली.

मूर्ती विटंबनेवरून बोरीअरब येथे तणाव
मारोती अटकेत : बाजारपेठ बंद
दारव्हा : बोरी (बु) येथील काळा मारूती मूर्ती विटंबनेच्या घटनेने येथे तणाव निर्माण झाला. निषेध सभा घेऊन बाजारपेठ बंद करण्यात आली. दरम्यान या प्रकरणी मारूती लक्ष्मण जाधव (३५) रा. बोरी बु. याला अटक करण्यात आली.
मंगेश शेटे हे सकाळी या मंदिरात दर्शनासाठी गेले असता दगडी मूर्तीचा हात तुटल्याचे आणि चेहऱ्यावर लोखंडी वस्तूने प्रहार केल्याचे त्यांंना आढळले. ही बाब त्यांनी गावकऱ्यांना सांगितली. मूर्ती विटंबनेची खात्री झाल्यानंतर दारव्हा पोलिसांना माहिती देण्यात आली.
सकाळी ९ वाजता निषेध सभा घेऊन बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. दरम्यान यवतमाळ येथून राज्य राखीव पोलीस दल यासह लाडखेड, दिग्रस, दारव्हा पोलीस दाखल झाले.
मंदिरापासून दोनशे फूट अंतरावर आढळलेला घन आणि पिशवीवरून मूर्ती घनाने फोडल्याचा अंदाज बांधण्यात आला. रात्री एक व्यक्तीने मद्यधुंदीत गोंधळ घातल्याची बाब लोकांनी पोलिसांना सांगितली. पकडण्यासाठी पाठलाग करताच संबंधित व्यक्तीने धूम ठोकली. त्यामुळे हा प्रकार त्यानेच केल्याचा संशय बळावला. यावरून मारूती लक्ष्मण जाधव (३५) याला ताब्यात घेण्यात आले. त्याने मूर्ती विटंबनेची कबुली दिली. धीरज सुरेश जयस्वाल रा. बोरी यांच्या तक्रारीवरून त्याच्या गुन्हा गुन्हा नोंदविला. विटंबना झालेली मूर्ती गावकऱ्यांनी पाथ्रडदेवी येथील धरणात विसर्जित केली. (प्रतिनिधी)