नगरपरिषदेत १६ कोटींच्या काँक्रीट रस्ते निविदा मंजूर
By Admin | Updated: October 2, 2016 00:15 IST2016-10-02T00:15:47+5:302016-10-02T00:15:47+5:30
नगरपरिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत सिमेंट काँक्रीटच्या रस्ता निर्मितीसाठी प्राप्त निविदांना मंजुरी देण्यात आली.

नगरपरिषदेत १६ कोटींच्या काँक्रीट रस्ते निविदा मंजूर
यवतमाळ : नगरपरिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत सिमेंट काँक्रीटच्या रस्ता निर्मितीसाठी प्राप्त निविदांना मंजुरी देण्यात आली. १६ कोटी ५० लाखांच्या या निविदा मंजूर करण्यात आल्या. याशिवाय या बैठकीत ४५ विषय एकमुखाने मंजूर करण्यात आले. शनिवारी सकाळी ११ वाजता आयोजित बैठक काही मिनिटातच आटोपली.
स्थायी समितीच्या बैठकीत प्रामुख्याने कार्योत्तर मंजुरीसाठीच अनेक विषय ठेवण्यात आले होते. यात प्रामुख्याने गणपती, दुर्गादेवी विसर्जनासाठी विहिरींची साफसफाई, पावसाळ्यापूर्वी अंतर्गत रस्त्यावरील ह्यूम पाईप बदलविणे अथवा त्याची साफसफाई करणे या खर्चाला कार्योत्तर मंजुरी देण्यात आली. याशिवाय दलित वस्ती अंतर्गत तलावफैल येथील झेंडा चौक ते बोरगाव रोड आणि तेथून रिंगरोड चौकापर्यंत रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणाच्या निविदा मंजूर करण्यात आल्या. याशिवाय दलित सोसायटीतील काँक्रीट नाली, प्रभाग क्र. ७ मध्ये क्राँकीट नाली, वैशिष्ट्यपूर्ण कामांतर्गत आठवडी बाजार परिसरात दहा कोटींचे क्राँकीट रस्ते व इतर विकासात्मक कामे यासाठी प्राप्त ई-निविदांना मंजुरी देण्यात आली. १४ व्या वित्त आयोगातून शहरात बायोगॅस प्लाँटची उभारणी करण्यास निविदा मंजूर करण्यात आली. नगरपरिषद क्षेत्रात नव्याने समाविष्ठ झालेल्या भागातील मतदान केंद्र इमारतींची किरकोळ दुरुस्ती, आवश्यक त्या ठिकाणी रॅम्प तयार करण्याला मंजुरी देण्यात आली. शहरातील वाढीव भागात गाजर गवत, झाडे झुडूपे कापण्यासाठी कटर मशीन खरेदी केली जाणार आहे. महत्वपूर्ण विषय एकमुखाने मान्य करण्यात आले. (कार्यालय प्रतिनिधी)