साई मंदिराची दानपेटी फोडली
By Admin | Updated: December 10, 2015 02:29 IST2015-12-10T02:29:45+5:302015-12-10T02:29:45+5:30
येथील दारव्हा मार्गावरील महावीरनगरातील साई मंदिराची दानपेटी फोडून अज्ञात चोरट्याने सुमारे २० हजार रुपये लंपास केल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली.

साई मंदिराची दानपेटी फोडली
यवतमाळ : येथील दारव्हा मार्गावरील महावीरनगरातील साई मंदिराची दानपेटी फोडून अज्ञात चोरट्याने सुमारे २० हजार रुपये लंपास केल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. सुरक्षा रक्षकाने आरडाओरडा केल्याने दोन चोरटे दुचाकी तेथेच सोडून पळून गेले.
साई मंदिराच्या मागच्या बाजूचे खिडकीचे गज वाकवून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. मंगळवारी पहाटे मंदिरात कुणी नसल्याची संधी साधून त्यांनी दानपेटीचा कुलूप कोंडा तोडला. या दानपेटीतील रोख रक्कम घेऊन चोरटे पसार होण्याच्या तयारीत होते. त्यावेळी हा प्रकार सुरक्षा रक्षक शंकर ठाकरे यांच्या लक्षात आला. त्याने आरडाओरडा केला.
त्यामुळे परिसरातील नागरिक जागे झाले. चोरट्यांचा पाठलाग केला असता चोरट्यांनी दुचाकी एम.एच.२९-क्यू-१९३० घटनास्थळीच सोडून पळ काढला. यानंतर या घटनेची माहिती लोहारा पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळ गाठून चोरट्यांची दुचाकी ताब्यात घेतली. या प्रकरणी लोहारा पोलिसांनी दोन अज्ञात तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदविला. चोरट्यांचा शोध सुरू आहे. (प्रतिनिधी)