माळीपुरा जैन मंदिरातून पितळी मूर्ती लंपास
By Admin | Updated: August 15, 2015 02:25 IST2015-08-15T02:25:26+5:302015-08-15T02:25:26+5:30
येथील माळीपुरा परिसरात असलेल्या जैन मंदिरातून ७०० ग्रॅम वजनाची पितळी मूर्ती लंपास केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली.

माळीपुरा जैन मंदिरातून पितळी मूर्ती लंपास
यवतमाळ : येथील माळीपुरा परिसरात असलेल्या जैन मंदिरातून ७०० ग्रॅम वजनाची पितळी मूर्ती लंपास केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली.
येथील माळीपुरा परिसरात असलेल्या जैन मंदिरात रात्री अज्ञात चोरट्याने प्रवेश केला. मंदिराच्या वरच्या मजल्यावर असलेली ७०० ग्रॅम वजनाची पितळी मूर्ती चोरुन नेली. यामूर्तीची किंमत एक हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अतुल गंगाधर गोंधळे रा. जैन मंदिर माळीपुरा यांनी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेची माहिती होताच अनेकांनी मंदिराकडे धाव घेतली.
अधिक तपास यवतमाळ शहर पोलीस करीत आहे. चोरट्यांच्या निशाण्यावर घरांसोबत आता धार्मिक स्थळेही दिसत आहे.