यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात गुरूवार ३० मार्च रोजी ‘टेक्नो-एक्स्ट्रीम-१७’ ही राष्ट्रीय पातळीवरील तांत्रिक परिषद आयोजित करण्यात आली आहे. आयटी, सीएसई, ईक्सटीसी, इलेक्ट्रीकल व आयईटीई यवतमाळ उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद घेण्यात येत आहे. तंत्रनिकेतन, अभियात्रिकी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या सुप्त तांत्रिक कलागुणांन एक हक्काचे व्यासपीठ देणारी ही परिषद आहे. उद्घाटन सकाळी १०.३० वाजता संस्थेचे सचिव किशोर दर्डा यांच्या अध्यक्षतेत होईल. प्रमुख पाहुणे म्हणून महिला निवासी शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ.आर.पी. मोगरे, शासकीय तंत्रनिकेतन अमरावतीच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ.पी.पी. करडे आदी उपस्थित राहतील. या परिषदेतील पेपर प्रेझेंटेशनमधील निवडक गुणवत्ताधारित पेपर्स ‘आयजे एफईएटी’ (इंटर नॅशनल जर्नल फॉर इंजिनिअरिंग अप्लीकेशन्स अँड टेक्नॉलॉजी) या नामांकित आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्घ होणार आहे. परिषदेतील गरजांच्या मूल्यमापनासाठी तज्ज्ञांना निमंत्रीत करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि विजेत्यांना बक्षीस दिले जाणार आहे. परिषदेविषयी माहिती, नियमावली आणि सहभागासाठी ईच्छुक विद्यार्थ्यांनी ६६६.्न्िरी३.ंू.्रल्ल हे संकेतस्थळ पहावे असे, प्रा. ओंकार चांदुरे, प्रा. कोमल पुरोहित यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी पंकज मुलचंदानी, अनिस भाटी, अक्षय निंबोकार यांच्याशी संपर्क करता येईल. परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, सल्लागार डॉ.डी.एन. चौधरी, संयोजक डॉ.ए.डी. राऊत, डॉ.एस.एम. गुल्हाने, जे.एस. सातुरवार, डॉ.पी.एम. पंडीत, सहसंयोजक प्रा.एम.आर. शहाडे यांचे सहकार्य लाभत आहेत. (वार्ताहर)
‘जेडीआयईटी’मध्ये टेक्नो-एक्स्ट्रीम राष्ट्रीय परिषद
By admin | Updated: March 27, 2017 01:16 IST