शिक्षकांच्या कार्यशाळेत झळकला ‘लोकमत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 21:13 IST2019-04-23T21:13:28+5:302019-04-23T21:13:59+5:30
अल्पवयीन मुले विविध गैरमार्गाकडे वळत असल्याबाबत ‘लोकमत’ने सोमवारी वृत्त प्रकाशित केले होते. याच वृत्ताचा आधार घेत येथे शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या मार्गदर्शन कार्यशाळेत प्रकाश टाकण्यात आला.

शिक्षकांच्या कार्यशाळेत झळकला ‘लोकमत’
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : अल्पवयीन मुले विविध गैरमार्गाकडे वळत असल्याबाबत ‘लोकमत’ने सोमवारी वृत्त प्रकाशित केले होते. याच वृत्ताचा आधार घेत येथे शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या मार्गदर्शन कार्यशाळेत प्रकाश टाकण्यात आला. पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्यांना योग्य दिशा दिली पाहिजे, असे आवाहन या कार्यशाळेत करण्यात आले.
येथील एसपीएम कन्या शाळेत सोमवारी कल व अभिक्षमता समुपदेशन कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेकरिता मार्गदर्शक म्हणून किशोर बनारसे, श्याम पंचभाई उपस्थित होते. तालुक्यातील माध्यमिक शाळांचे अविरत प्रशिक्षण घेतलेले मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांची अभिक्षमता कशी तपासायची याबद्दल किशोर बनारसे यांनी तर क्षमता, आवड व संधी यातून करिअर घडविण्यास कशी मदत होते याबाबत पंचभाई यांनी मार्गदर्शन केले. तर ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या ‘पालकांनो, मुलांकडे लक्ष द्या’ या वृत्ताचा आधार घेऊन मुलांना कसे समजून घेता येईल, यावर मार्गदर्शन करण्यात आले. तालुका सुलभक जी.डी.कैटीकवार, गजानन देमापुरे, संगीता मुनेश्वर उपस्थित होते. तर कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी विषय साधनव्यक्ती श्रीकांत पायताडे, आकाश कवासे, मानव लढे, अर्चना मनोहर यांनी परिश्रम घेतले.