परीक्षेच्या तोंडावर शिक्षकांचा ‘ई-मॉडेल शाळा’ अभ्यास दौरा

By Admin | Updated: March 24, 2015 23:54 IST2015-03-24T23:54:11+5:302015-03-24T23:54:11+5:30

शालेय परीक्षा अवघ्या काही दिवसावर आल्या असताना जिल्ह्यातील काही केंद्रातील शिक्षक ‘ई’ वर्गाच्या मॉडेल्स शाळा पाहण्यासाठी ठाणे-मुंबईला गेले आहेत.

Teachers 'e-model school' practice tour on the face of the exam | परीक्षेच्या तोंडावर शिक्षकांचा ‘ई-मॉडेल शाळा’ अभ्यास दौरा

परीक्षेच्या तोंडावर शिक्षकांचा ‘ई-मॉडेल शाळा’ अभ्यास दौरा

यवतमाळ : शालेय परीक्षा अवघ्या काही दिवसावर आल्या असताना जिल्ह्यातील काही केंद्रातील शिक्षक ‘ई’ वर्गाच्या मॉडेल्स शाळा पाहण्यासाठी ठाणे-मुंबईला गेले आहेत. आपल्या भागातील विद्यार्थ्यांना या शाळांचा फायदा करून देता येईल, हा या मागील उद्देश असल्याचे सांगितले जाते. मात्र उन्हाळ््याच्या सुटीत हा दौरा काढता आला नसता काय, असा प्रश्न पालकांमधून उपस्थित केला जात आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शनासाठी सध्याचा कालावधी अतिशय महत्त्वाचा आहे. ही बाब शिक्षकांना अभ्यास दौऱ्यावर पाठविताना गांभिर्याने घेण्यात आली नाही. यापूर्वी जिल्ह्याच्या अनेक केंद्रातील शिक्षकांनी ‘ई’ वर्गाच्या मॉडेल्स शाळा अभ्यासल्या. मात्र आता परीक्षेच्या तोंडावरच तिवसा आणि मंगरूळ केंद्राच्या प्रमुखांसह या केंद्रांतर्गत येणाऱ्या शाळेतील जवळपास ३८ ते ४० शिक्षक २६ मार्चपर्यंत अभ्यास दौऱ्यावर आहेत. प्रत्येक शाळेतून दोन ते तीन शिक्षक शाळा पाहणीसाठी गेले आहेत.
या शिक्षकांना शिक्षण विभागानेच सुट्या मंजूर केल्या आहे. यावरून शिक्षण विभागही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाप्रती किती दक्ष आहे, हे स्पष्ट होते. शिक्षक स्वखर्चाने हा दौरा करत असल्याचे मात्र शिक्षण विभागाकडून आवर्जून सांगितल्या जाते.
दौऱ्याच्या खर्चाचा भार शिक्षण विभागावर पडत नसला तरी विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान त्यापेक्षा अधिक महागात पडणारे ठरू शकते. काही पालकांनी ही बाब जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांकडे मांडली. यावर काय कारवाई होत याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)

Web Title: Teachers 'e-model school' practice tour on the face of the exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.