यवतमाळ जिल्ह्यात शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 16:53 IST2019-10-09T16:52:23+5:302019-10-09T16:53:03+5:30
मुडाणा येथील एका शिक्षकाने बुधवारी दुपारी १ च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

यवतमाळ जिल्ह्यात शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: मुडाणा येथील एका शिक्षकाने बुधवारी दुपारी १ च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. अमोल वसंतराव गलबे (३२) असे या शिक्षकाचे नाव असून ते, येथील केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेत कला शिक्षक होते. त्यांनी राहत्या घरी साडीने गळफास घेतला. त्यांच्या शेजारी राहणारे नंदू वानखेडे यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी त्याची माहिती नातेवाईकांना दिली. गावातील पोलीस पाटील दिलीप खराटे, माजी आमदार राजेंद्र नगरधने यांनी पोलिसांना ही घटना कळविली. अमोल गुलबे यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, वडील व मोठा आप्त परिवार आहे.