शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
3
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
4
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
5
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
6
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
7
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
8
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
9
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...
10
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
11
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
12
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
13
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
14
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
15
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
16
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
17
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
18
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
19
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
20
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

विदर्भाचा लेक IAS होणार, टॅक्सी चालकाच्या मुलाचे यूपीएससीत यश!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 2:18 AM

गरिबीतून घेतले शिक्षण; यवतमाळच्या अझहर काझी यांची भरारी, जिल्ह्यातील तीन गुणवंत

अविनाश साबापुरे।यवतमाळ : गरीब घरात गुणवत्ता जन्माला आली की, जिंकण्याची जिद्द अधिक धारदार बनते. कष्टाच्या पायऱ्या चढत यशाचा कळसही गाठता येतो. येथील काळीपिवळी टॅक्सी चालकाचा मुलगा अझहर काझी आता आयएएस अधिकारी होणार आहे. त्यांनी ३१५ वी रँक मिळविली. त्यांनी बँकिंग परीक्षांची तयारी केली. २०१२ मध्ये ते पीओ परीक्षा उत्तीर्ण होऊन कार्पोरेशन बँकेत लागले. बंगळूरू, नागपूर व यवतमाळ येथे शाखाप्रमुख म्हणून काम केले. २०१८ मध्ये त्यांनी नोकरी सोडून दिल्लीत जॅमिया हमदर्द युनिव्हर्सिटीत निवासी प्रशिक्षण अकादमीत प्रवेश घेतला. आता दुसºया प्रयत्नात ते यूपीएससीमध्ये यशस्वी झाले आहेत. वणीतील अभिनव इंगोले, सुमित रामटेके हे सुद्धा उत्तीर्ण झाले आहेत.एसटी मेकॅनिकच्या मुलाने सर केले शिखरउमरगा (जि़उस्मानाबाद) : एकूरगा येथील असित नामदेव कांबळे यांनी देशात ६५१ वा रँक मिळविला आहे. यावर्षीच मार्च महिन्यात त्यांनी भारतीय वनसेवा परीक्षेत देशात ६६ वा क्रमांक पटकाविला होता. त्यांचे वडील एसटीत मेकॅनिक आहेत.मला यूपीएसीच्या मुलाखतीमध्ये यवतमाळचे तत्कालीन पोलीस अधीक्षक अब्दूर रहमान आणि विद्यमान अपर पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांचे मार्गदर्शन खूप महत्त्वाचे ठरले. आयएएस होऊन समाजाची सेवा करावी, हे माझे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.- अझहर काझी, यवतमाळलहान भाऊही दिल्लीतलहान भाऊ डॉ. उमेर काझी हेही दिल्लीत गेले आहे. यवतमाळच्या मेडिकल कॉलेजमध्ये असलेली नोकरी सोडून ते यूपीएससीच्या तयारीसाठी फेब्रुवारी महिन्यात जॅमिया हमदर्द युनिव्हर्सिटीत गेले आहेत. तर आणखी एक लहान भाऊ जुबेर अभियंता, सर्वात लहान भाऊ अ‍ॅड. साकीब राजा वकिली करीत आहेत.

आईवडिलांना गगन ठेंगणेप्रतिकूल परिस्थितीत अझहर यांचे भविष्य घडविणारे त्यांचे आईवडील मिराज आणि झहीरुद्दीन काझी यांच्या आनंदाला मंगळवारी पारावार राहिला नाही. केवळ दहावीपर्यंत शिकलेल्या या दाम्पत्याचा एक मुलगा आता आयएएस होणार आहे.अंकिता वाकेकर एससी वर्गात राज्यात प्रथमनाशिक : नाशिकची अंकिता अरविंद वाकेकर यांनी यूपीएससीमध्ये राज्यात मागासवर्गीय वर्गात अव्वल क्रमांक पटकावला आहे. देशात ५४७ वी रॅँक पटकावली. एकलहरा औष्णिक विद्युत केंद्रात उपकार्यकारी अभियंता असलेले अरविंद व जिल्हा प्रशासनात नायब तहसीलदार असलेल्या संघमित्रा वाकेकर यांची कन्या असलेली अंकिता बालपणापासूनच हुशार विद्यार्थिनी आहे.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगYavatmalयवतमाळ