वृषभचा गळा चिरल्यावरही तोंडावर टाकला दगड

By Admin | Updated: July 6, 2016 02:52 IST2016-07-06T02:52:06+5:302016-07-06T02:52:06+5:30

वृषभ चौधरीवर कारमध्ये चाकूने वार करून अर्धमेल्या अवस्थेत कोळंबी फाट्यावर फेकण्यात आले.

Taurus stone stone thrown on the face of the throat | वृषभचा गळा चिरल्यावरही तोंडावर टाकला दगड

वृषभचा गळा चिरल्यावरही तोंडावर टाकला दगड

कोळंबी फाट्याचे प्रकरण : खुनात वापरलेले शस्त्र यवतमाळातून जप्त
अकोलाबाजार : वृषभ चौधरीवर कारमध्ये चाकूने वार करून अर्धमेल्या अवस्थेत कोळंबी फाट्यावर फेकण्यात आले. ठार झाल्याची खात्री करण्यासाठी त्याचा गळा चिरुन त्याच्या तोंडावर मोठा दगड टाकल्याची कबुली वडगाव जंगल पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींनी दिली आहे.
यवतमाळ येथील धनश्रीनगरातील वृषभ सुधाकर चौधरी याचा निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी यश दिलीप छतवाणी, गोलू उर्फ अनिकेत बोरले, ऋषिकेश पुरुषोत्तम गडमडे या तिघांना अटक केली असून त्यांची पोलीस कोठडी घेतली आहे. या तिघांनी अंगावर शहारे येईल अशा पद्धतीने वृषभचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अंकितच्या आई व बहिणीकडे वृषभ वाईट नजरेने पाहत असल्याने त्याचा खून केल्याचे या तिघांनी पोलिसांना सांगितले. घटनेच्या दिवशी कार चालक यश छत्ताणी याने चिंतामणी दर्शनाला जाण्यासाठी पुजारी भगवतीप्रसाद दुबे यांची इंडिगो कार भाड्याने घेतली होती. सायंकाळी ६.३० वाजता यशने वृषभला फोन करून पांढरकवडा रोडवर बोलाविले. वृषभची दुचाकी एका धाब्यावर ठेऊन कारच्या समोरच्या सीटवर बसविले. तेथून ७.३० वाजताच्या दरम्यान बायपासने अकोलाबाजार रस्त्याकडे गाडी वळविण्यात आली. त्यावेळी वृषभने आपण कोठे चाललो असे विचारल्यावर फिरुन येऊ असे अंकितने सांगितले. थोडे अंतर गेल्यावर वृषभच्या डोळ्यात तिखट फेकण्यात आले. डोळे चोळत वृषभ खाली वाकतानाच त्याच्या पाठीत धारदार चाकूने सपासप वार केले. एक वार पोटातही करण्यात आला. कोळंबी फाट्याजवळ जंगलात कार थांबवून वृषभचे पाय ओढून त्याला रस्त्यालगत फरफटत नेले. त्यावेळी वृषभ जीवंत होता. त्यामुळे पुन्हा त्याचा चाकूने गळा चिरण्यात आला. एवढ्यावरही मारेकऱ्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी बाजूचा मोठा दगड उचलून अंकितच्या तोंडावर टाकला. मरण पावल्याची खात्री झाल्यानंतरच तिघे तेथून पसार झाले, अशी माहिती पोलीस कोठडीतील तीनही आरोपींनी वडगाव जंगल पोलिसांना दिली आहे.
घटनेत वापरलेले शस्त्र शोधण्यासाठी वडगाव जंगल पोलीस यवतमाळ येथील आरोपीच्या घराचा शोध घेतला. त्यावेळी सिव्हील लाईन मधील जुन्या वाड्यातून पोलिसांनी चाकू जप्त केला. दरम्यान वृषभचा एक मोबाईल पोलिसांनी आरोपी ऋषिकेशच्या घरातील कपाटातून जप्त केला तर दुसरा मोबाईल गोदामफैलातील सांडपाण्यात फेकून दिल्याचे सांगण्यात आले. आरोपींनी रक्ताने माखलेले आपले कपडे जाळून नाल्यात फेकले आहे. अधिक तपास वडगाव जंगलचे ठाणेदार प्रकाश राऊत, पोलीस उपनिरीक्षक हसन पठाण, एएसआय हनुमान सातघरे, बालाजी ससाने, प्रदीप थोरात, विजय मानकर, प्रेमदास खुलके, हरिभाऊ ठाकरे, महिपाल राठोड, नकूल रोडे, राजू मुत्यलवार, मधुकर पवार करीत आहे. (वार्ताहर)

Web Title: Taurus stone stone thrown on the face of the throat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.