तूरडाळीचे भाव ७० रुपये करा

By Admin | Updated: December 18, 2015 02:54 IST2015-12-18T02:54:39+5:302015-12-18T02:54:39+5:30

प्रचंड वाढलेले तूरडाळीचे भाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आव शासन आणत आहे.

Tauradi prices up to Rs 70 | तूरडाळीचे भाव ७० रुपये करा

तूरडाळीचे भाव ७० रुपये करा

शहर काँग्रेस : जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
यवतमाळ : प्रचंड वाढलेले तूरडाळीचे भाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आव शासन आणत आहे. मात्र, भाव वाढलेलेच आहेत. त्यामुळे तूरडाळीचे भाव ७० रुपये किलो इतके करावे, अशी मागणी शहर काँग्रेस कमिटीने केली आहे. मागणीचे निवदेन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
सरकार आश्वासनांची खैरात वाटत आहे. मुख्यमंत्र्यांनीसुद्धा तूरडाळीचे भाव १०० रुपये किलो करण्याचे आश्वासन दिवाळीत दिले होते. परंतु, दिवाळी होऊन बराच कलावधी झाला तरी अजूनही तूरडाळीचे भाव उतरलेले नाहीत. या भाववाढीमुळे जनसामान्य व गोरगरीब माणसांना जगणे कठीण झाले आहे. सर्वसामान्य माणसाची अडचण लक्षात घेत शहर काँग्रेस कमिटीने या भाववाढीचा निषेध नोंदविला आहे.
तूरडाळीचे भाव लवकरात लवकर कमी करून ते ७० रुपये किलो करावे, अशी मागणी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चंद्रशेखर चौधरी, गोकुल कोकेवार, अरुण ठाकूर, उमेश इंगळे, अजय किन्हीकर, घनश्याम अत्रे, प्रदीप डंभारे, प्रशांत काळे, जयंत डाखोरे, दत्ता हाडके, अनिल सावरकर, अमोल पाम्पट्टीवार, पवन माळोदे, संतोष नंदनवार, संदीप गणवीर, नीलेश राठोड आदींनी केली आहे. भाववाढ रोखण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Tauradi prices up to Rs 70

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.