तरोडा ग्रामपंचायत कार्यालय लोकार्पित

By Admin | Updated: February 4, 2016 02:30 IST2016-02-04T02:30:47+5:302016-02-04T02:30:47+5:30

तरोडा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण मंगळवारी करण्यात आले.

Taroda Gram Panchayat Office Recognized | तरोडा ग्रामपंचायत कार्यालय लोकार्पित

तरोडा ग्रामपंचायत कार्यालय लोकार्पित

कळंब : तरोडा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण मंगळवारी करण्यात आले. उद्घाटक आमदार डॉ.अशोक उईके तर अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी होते.
प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, पंचायत समिती सभापती वर्षा वासेकर, सदस्य विजय सुटे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बालू पाटील दरणे, पणन महासंघाचे संचालक सुरेश चिंचोळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष पाटील कदम, कळंबचे नगरसेवक राजेंद्र हारगुडे, सुरेश केवटे, पार्डीच्या सरपंच अर्चना भोयर, भाजपाचे तालुकाध्यक्ष कैलास बोंद्रे, ग्रामपंचायत सदस्य पवन कदम, गटविकास अधिकारी डॉ.मनोहर नाल्हे, सहायक गटविकास अधिकारी पद्माकर मडावी, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता शरद राघमवार, माजी सरपंच संजय दरणे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी गाव विकासाच्या संदर्भात विविध योजनांची माहिती दिली. लोकांनीही पिण्याची समस्या अधिकारी व लोकप्रतिनिधीपुढे मांडली.
या कार्यक्रमाला सरपंच विवेक ठाकरे, ग्रामसेविका दीपिका धोपटे, मंगेश होरे, शिक्षक पठाण, अनंत नाटक, पुष्पा मेंढे, रवींद्र उईके, दिनेश डहाके, प्रभाकर खडसे, कृषी सहायक महेंद्र ओंकार, प्रज्ञा बोबडे, ज्ञानेश्वर गावंडे, अरुण इंगळे, रवी उईके, सुधाकर डहाके, नामदेव आत्राम, परशराम खोडे, रामभाऊ गाडेकर, सुनील होरे, अनिल ठाकरे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Taroda Gram Panchayat Office Recognized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.