तारिक लोखंडवालास अटक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 21:55 IST2018-05-07T21:55:24+5:302018-05-07T21:55:24+5:30
राळेगाव तालुक्याच्या वाऱ्हा येथील रेती घाटावर मारहाण, हवेत गोळीबार करून मशीन जाळल्या प्रकरणात मो. तारिक मो. शमी लोखंडवाला याला तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी सोमवारी प्रभारी जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू यांच्याकडे करण्यात आली आहे.

तारिक लोखंडवालास अटक करा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राळेगाव तालुक्याच्या वाऱ्हा येथील रेती घाटावर मारहाण, हवेत गोळीबार करून मशीन जाळल्या प्रकरणात मो. तारिक मो. शमी लोखंडवाला याला तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी सोमवारी प्रभारी जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू यांच्याकडे करण्यात आली आहे.
जिल्हा गौण खनिज वाहतूक व रेती घाट संघटनेचे अध्यक्ष सचिन महल्ले, उपाध्यक्ष कृष्णा ढाले, सचिव सगीर अन्सारी, मुन्ना सिद्दिकी, सचिन दरणे यांच्या नेतृत्त्वात निवेदन सादर करण्यात आले. १० ते १२ जणांनी वाºहा ग्रामपंचायत हद्दीतील घाट क्र.२ वर धुमाकूळ घातला. आधी घाट घेऊ नये म्हणून धमक्या देण्यात आल्या. नंतर पाच लाखांच्या खंडणीसाठी मारहाण करून मशीन जाळण्यात आली. यावेळी गोळीबार करण्यात आला. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून चार ते पाच जण फरार आहेत. तारिक लोखंडवाला हा या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. सागीर खान वहीद खान, मुन्ना उर्फ शेख नजमून निसा शेख यांनाही अटक करण्याची मागणी करण्यात आली. लोखंडवाला व साथीदारांपासून आपल्या व कुटुंबाच्या जीविताला धोका असल्याचे सचिन महल्ले यांनी म्हटले आहे. त्यांच्या रेती घाटावरील दिवाणजी प्रशांत महल्ले व त्यांचा सहकारी अक्षय पालकर यांना मारहाण करण्यात आली होती. या निवेदनावर सचिन घोडे, किरण खडसे, सुभाष भोयर, प्रशांत डगवार, पंकज कोल्हे, राहुल इंगोले, शेख वसीम शेख मोहम्मद, साबीर बेग, सचिन भोयर, मिथून खाडे, अनिल लडके व संघटनेतील ५० पेक्षा अधिक सदस्यांच्या स्वाक्षºया आहेत.