अभयारण्यातील वनौषधी तस्करांच्या निशाण्यावर

By Admin | Updated: November 30, 2014 23:14 IST2014-11-30T23:14:23+5:302014-11-30T23:14:23+5:30

पैनगंगा अभयारण्याच्या घनदाट जंगलात वनऔषधींचा अनमोल खजाना दडला आहे. २७० विविध प्रजातीची दुर्मिळ वनौषधी या जंगलात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून आंध्रप्रदेश

On the target of the herbal smugglers of the sanctuary | अभयारण्यातील वनौषधी तस्करांच्या निशाण्यावर

अभयारण्यातील वनौषधी तस्करांच्या निशाण्यावर

उमरखेड (कुपटी) : पैनगंगा अभयारण्याच्या घनदाट जंगलात वनऔषधींचा अनमोल खजाना दडला आहे. २७० विविध प्रजातीची दुर्मिळ वनौषधी या जंगलात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून आंध्रप्रदेश व मराठवाड्यातील तस्करांची नजर या वनौषधीवर गेली आहे. सागवान कत्तलीसोबत दुर्मिळ वनौषधीनी नष्ट होण्याची भीती आहे.
उमरखेड तालुक्यात पैनगंगा नदीच्या तीरावर पैनगंगा अभयारण्यात पसरले आहे. या अभयारण्यात वन्यजीवांसोबतच दुर्मिळ वनऔषधी आहे. त्यात गुळवेल, धामणवेल, पिंपळवेल, गवतपर्णी, खैर, मारदन, सूर्या, कदंब, मोह, चारोळी, आवळा, बेहळा, अंजन, चिंच, सालई, हळदबेरा, पांघरा, पळस, चंद्रज्योती, पिंपळ, बिजासाग, गिदासाग, चिमनसाग आदी वृक्ष असून निर्गुडा, बोराटी, भराटी, आमटी, रानमुनिया आदी झुडूपी वनौषधी आहे. तर गवत जातीतील तिरकडी, पवना, मारवेल, कुसळी, कुंदा या जाती आहे. यासह इतर २७० जातीची वनऔषधी या जंगलात आहे. जंगलातील रहिवासी आपल्या परंपरागत ज्ञानाचा उपयोग करून वनऔषधीचे जतन करीत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात आंध्र व मराठवाड्यातील तस्कर या जंगलात सक्रिय झाले आहे. सागवानासोबतच वनऔषधी झाडे तोडण्याचा सपाटा लावला आहे. अनेकांना वनऔषधीची माहिती नसल्याने मुळा सकट झाड उपटून नेण्याचे प्रकार घडत आहे. तसेच विविध बहुमूल्य वृक्ष तोडण्यासाठी परप्रांतातील मंडळी येथे डेरे दाखल असतात. पांढरा पळस हा दुर्मिळ असून या जंगलात पांढरा पळस असल्याची माहिती आहे. या पळसाच्या शोधात अनेक जण नेहमी असतात. पांढऱ्या पळसाच्या शोधात इतर पळसवृक्षांवर ते सर्रास कुऱ्हाड चालवीत आहे. गुप्तधन शोधणाऱ्या टोळ्याही या भागात मोठ्या प्रमाणात सक्रिय असून जंगलामध्ये मोठमोठाले खड्डे खोदले जात आहे. या खड्ड्यांमुळे वृक्षांना धोका पोहोचत आहे. (वार्ताहर)

Web Title: On the target of the herbal smugglers of the sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.