सोलापूरचे तानाजी सावंत यवतमाळ विधान परिषदेचे शिवसेनेचे उमेदवार
By Admin | Updated: November 2, 2016 16:17 IST2016-11-02T16:17:51+5:302016-11-02T16:17:51+5:30
विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी होणा-या निवडणुकीकरिता शिवसेना-भाजपा युतीने उद्योजक तानाजी सावंत यांना उमेदवारी दिली

सोलापूरचे तानाजी सावंत यवतमाळ विधान परिषदेचे शिवसेनेचे उमेदवार
ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. २- विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी १९ नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीकरिता शिवसेना-भाजपा युतीने सोलापूर जिल्ह्यातील माढाचे शिक्षण सम्राट तथा उद्योजक तानाजी सावंत यांना उमेदवारी दिली आहे.
सावंत यांनी बुधवारी यवतमाळच्या जिल्हा निवडणूक निर्णय अधिका-यांकडे आपले नामांकन दाखल केले. युतीमध्ये ही जागा सेनेच्या वाट्याला आहे. सेनेने यावेळी तानाजी सावंत यांच्या रूपाने तगडा उमेदवार निवडणूक आखाड्यात उतरविला आहे. येथे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असून त्यांच्यापुढे सेनेने मोठे आव्हान उभे केले आहे. या मतदारसंघात काँग्रेसच्यावतीने पांढरकवड्याचे माजी नगराध्यक्ष शंकर बडे यांनी नामांकन दाखल केले. राष्ट्रवादीने आपल्या विद्यमान आमदाराला यावेळी अपक्ष म्हणून रिंगणात उतरविले आहे. शिवसेनेने तानाजी सावंत या ‘मातोश्री’च्या गुडबुकमधील नेत्याला उमेदवारी देऊन येथे राजकीय धक्का दिला आहे. सावंत हे घोडेबाजाराच्या या निवडणुकीत सर्वात ‘सशक्त’ मानले जातात.