नेर तालुक्यात तलाठी कार्यालये बेवारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 21:27 IST2019-05-21T21:27:39+5:302019-05-21T21:27:59+5:30

नागरिकांची कामे सुलभ व्हावी यासाठी तालुक्यात बांधण्यात आलेली तलाठी कार्यालये बेवारस आहेत. तालुक्यात कुठेही तलाठ्यांचा या कार्यालयात प्रवेश झाला नाही. त्यामुळे या कामांवर खर्च करण्यात आलेले कोट्यवधी रुपये व्यर्थ जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Talathi offices in Ner Taluk | नेर तालुक्यात तलाठी कार्यालये बेवारस

नेर तालुक्यात तलाठी कार्यालये बेवारस

ठळक मुद्देनागरिकांत असंतोष : टुमदार इमारतींवरील कोट्यवधी रुपयांचा खर्च व्यर्थ जाण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : नागरिकांची कामे सुलभ व्हावी यासाठी तालुक्यात बांधण्यात आलेली तलाठी कार्यालये बेवारस आहेत. तालुक्यात कुठेही तलाठ्यांचा या कार्यालयात प्रवेश झाला नाही. त्यामुळे या कामांवर खर्च करण्यात आलेले कोट्यवधी रुपये व्यर्थ जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना तलाठी एका जागेवर उपलब्ध व्हावा यासाठी कार्यालये उभी करण्यात आली आहे. ३६ ग्रामपंचायतींमध्ये निवास आणि कार्यालय अशी दुहेरी सुविधा असलेली इमारत बांधण्यात आली. प्रत्येक इमारतीवर १९ लाख रुपयांपर्यंतचा खर्च करण्यात आला. सध्या तरी याचा वापर सुरू झालेला नाही.
तलाठी उपलब्ध होत नसल्याची ओरड नागरिकांमधून होते. त्यामुळेच शासनाने तलाठी कार्यालये बांधली. तलाठ्यांनी याच ठिकाणाहून कामे करावी, असे आदेश देण्यात आले. परंतु अद्याप तरी त्याठिकाणी तलाठी रुजू झालेले नाही. बेवारस असलेल्या या कार्यालयांवर आता समाजकंटकांनी ताबा घेतला आहे. मटका-जुगार खेळण्यासाठी या वास्तू उपयोगात आणल्या जात आहेत. काही आंबटशौकिनांनीही याचा वापर केला आहे. यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने तलाठ्यांच्या प्रवेशापूर्वीच ही कार्यालये भंगण्याची चिन्हे दिसू लागली आहे.
सुविधा नसल्याची ओरड
नवीन बांधण्यात आलेल्या तलाठी कार्यालयांमध्ये परिपूर्ण सुविधा नसल्याची ओरड तलाठ्यांमधून होत आहे. किचन, हॉल, कार्यालय आणि इतर सर्व बाबी याठिकाणी उपलब्ध आहे. आणखी याठिकाणी काय सुविधा असाव्या, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

Web Title: Talathi offices in Ner Taluk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.