दुचाकीवर बकऱ्या चोरणाऱ्यांना चोप
By Admin | Updated: February 20, 2015 01:46 IST2015-02-20T01:46:17+5:302015-02-20T01:46:17+5:30
यवतमाळ जिल्ह्यातील विविध गावांमधून बकऱ्या चोरून यवतमाळात विकणाऱ्या दोन भामट्यांना नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिल्याची घटना नेर येथे गुरुवारी घडली.

दुचाकीवर बकऱ्या चोरणाऱ्यांना चोप
नेर : यवतमाळ जिल्ह्यातील विविध गावांमधून बकऱ्या चोरून यवतमाळात विकणाऱ्या दोन भामट्यांना नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिल्याची घटना नेर येथे गुरुवारी घडली.
यवतमाळजवळील मोहा येथे राहणारा आकाश गायगोले व त्याचा साथीदार उज्ज्वल चेतवानी रा.यवतमाळ हे दोघे एम.एच.२७/ एए-८४६८ या दुचाकीने नेर येथे आले व अहमद खान पठाण यांची बकरी चोरी करून दुचाकीवरून घेवून गेले. ही बकरी जंगलात बांधून ठेवून पुन्हा चोरी करण्यासाठी आले. तोपर्यंत नागरिक बकरीच्या शोधात जंगलात पोहोचले आणि त्याचवेळी चोरटेही तेथे परत आले. एका लहान मुलाने हेच चोरटे असल्याचे सांगितले. त्यामुळे नागरिकांना त्यांना चांगलाच चोप देवून पोलिसांच्या स्वाधीन केले. यापूर्वी या चोरट्यांनी वटफळी येथून दोन बकऱ्या चोरी केल्याची कबुली दिली. तसेच वर्षभरात तालुक्यातून शेकडो बकऱ्या चोरी करून यवतमाळ येथे मटन विक्रेत्यांना या चोरट्यांनी विकल्याची शक्यता आहे. त्या दृष्टीकोनातून पोलीस तपास सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)