साहसी शिबिरांमध्ये झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 21:34 IST2019-05-04T21:33:39+5:302019-05-04T21:34:36+5:30
साहसी उन्हाळी शिबिरांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. यामध्ये मल्लखांब, रोप-वे, जिम्नॅस्टिक, ट्रेकिंग आणि स्केटिंगचा समावेश आहे. खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये साहस वाढावे, म्हणून शिबिरांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे.

साहसी शिबिरांमध्ये झुंबड
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : साहसी उन्हाळी शिबिरांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. यामध्ये मल्लखांब, रोप-वे, जिम्नॅस्टिक, ट्रेकिंग आणि स्केटिंगचा समावेश आहे. खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये साहस वाढावे, म्हणून शिबिरांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे. बदलत्या प्रवाहाचा धागा ओळखून आयोजित केल्या जाणाऱ्या शिबिरांना प्रतिसादही मिळत आहे.
उन्हाळ्याचे दिवस सुटीचे आणि मौजमजेचे तर आहेच; यासोबतच कलागुणांना वाव मिळावा म्हणून प्रयत्न करण्याचेही आहे. स्पर्धेच्या युगात आपला मुलगा मागे पडू नये म्हणून प्रत्येक पालक काळजी घेतो. यातूनच उन्हाळी शिबिरांमध्ये गर्दी वाढत आहे. साहसी शिबिरांकडे सर्वाधिक कल आहे.
जिल्हा क्रीडा विभागाने जयहिंद क्रीडा मंडळाच्या मदतीने उन्हाळी शिबिराचे आयोजन केले आहे. या ठिकाणी मल्लखांब शिकविला जात आहे. दुर्लक्षित झालेल्या या खेळाच्या पुनरुज्जीवनाचे काम केले जात आहे. उन्हाळी शिबिरात २५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. याशिवाय खो-खो, कबड्डी, रोप-वेचे कौशल्य शिकविले जात आहे.
मोबाईलपासून पिढी वाचवा
मुलांना साहसी खेळ खेळू द्या. म्हणजे त्यांचा समतोल विकास होईल. मात्र आजकालची मुले मोबाईलच्या नादात आहेत. त्यांना खेळ केवळ मोेबाईलमधलेच माहिती आहे. यामुळे त्यांचा विकास खुंटण्याची भीती आहे. याकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. मुले उन्हाळी शिबिरात जरी नसली तरी, खेळासाठी त्यांना प्रोत्साहित करून मैदानावर नेण्याची नितांत गरज आहे.
या मैदानांवर सुरू आहेत उन्हाळी क्रीडा शिबिर
स्थानिक नंदूरकर विद्यालयात अनेक वर्षांपासून स्केटिंगचे प्रशिक्षण दिले जात आहे. येथे स्केटिंग शिकणाºया विद्यार्थ्यांची संख्या दिवसेन्दिवस वाढत आहे. नेहरू स्टेडियमवर जिम्नॅस्टिकचा प्रकारही शिकविला जातो. यासह विवेकानंद विद्यालयाच्या मैदान, पळसवाडी कॅम्प, पिंपळगाव बायपाससह शहरातील विविध भागात उन्हाळी क्रीडा शिबिरे घेतली जात आहे.