स्वरांजली : ज्योत्स्ना दर्डा स्मृतीप्रीत्यर्थ २३ मार्चला आयोजन

By Admin | Updated: March 22, 2015 02:07 IST2015-03-22T02:07:13+5:302015-03-22T02:07:13+5:30

सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष आणि संगीताच्या निस्सीम साधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सोमवार २३ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता...

Swanjali: Jyotsna Darda memorial celebrated on 23rd March | स्वरांजली : ज्योत्स्ना दर्डा स्मृतीप्रीत्यर्थ २३ मार्चला आयोजन

स्वरांजली : ज्योत्स्ना दर्डा स्मृतीप्रीत्यर्थ २३ मार्चला आयोजन

यवतमाळ : सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष आणि संगीताच्या निस्सीम साधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सोमवार २३ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता येथील प्रेरणास्थळावर स्वरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीने प्रसिद्ध असलेले रूपकुमार राठोड आणि त्यांच्या कन्या गायिका रीवा राठोड स्वरांजली सादर करणार आहे.
अखेरच्या श्वासापर्यंत संगीताची साधना करणाऱ्या ज्योत्स्ना दर्डा या संगीताच्या निस्सीम साधक होत्या. त्यांच्या स्मृती दिनी त्यांना रूपकुमार राठोड व रीवा राठोड स्वरांजली अर्पण करणार आहे. हिंदी सिनेसृष्टीत आपल्या जादुई आवाजाने अधिराज्य गाजविणारे गझल आणि पार्श्वगीत गायक रूपकुमार राठोड लहानपणापासूनच संगीताशी जुळलेले आहेत. त्यांचे वडील आणि प्रसिद्ध ध्रृपद व शास्त्रीय गायक पंडित चतुर्भुज राठोड यांच्या तालमीत ते घडले.
सुरुवातीला तबला वादनाला रुपकुमार राठोड यांनी सुरुवात केली. १९८० च्या दशकात त्यांनी गझल गायनाला प्रारंभ केला आणि १९८९ मध्ये सिनेमात पार्श्व गायनाला प्रारंभ केला. गुमराह चित्रपटात मै तेरा आशिक हू हे संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेले गीत त्यांनी गायले. बॉर्डर या चित्रपटातील ‘संदेसे आते है’ हे गीत त्यांना प्रसिद्धीच्या झोतात घेऊन गेले. त्यांचे मितवा, खुशबू, मोहब्बत हो गई, बझमे मीर, प्यार का जश्न, वादा हे गाजलेले अल्बम आहेत. त्यांनी गुजराती, हिंदी, मराठी, तामिळ, तेलगू, बंगाली, ओरिया, आसामी, नेपाळी आणि भोजपुरी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. पत्नी प्रसिद्ध गायिका सोनाली राठोड यांच्यासोबत त्यांनी देश आणि विदेशात गाण्याचे शेकडो कार्यक्रम सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांची कन्या रीवा राठोड हीसुद्धा यवतमाळात त्यांच्यासोबत गायन करणार आहे. आई-वडिलांपासून संगीताचे शिक्षण घेणारी रीवा ही हिंदुस्थानी आणि कर्नाटकी शास्त्रीय गायिका आहे.
वडील रुपकुमार आणि कन्या रीवा यांची अनोखी मैफिल ऐकण्याची संधी यवतमाळकरांना आली आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Swanjali: Jyotsna Darda memorial celebrated on 23rd March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.