‘स्वामिनी’ची एक्साईजवर धडक

By Admin | Updated: May 18, 2016 02:46 IST2016-05-18T02:46:13+5:302016-05-18T02:46:13+5:30

जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी व्हावी यासाठी स्वामिनी जिल्हा दारूबंदी अभियानाच्या महिलांनी राज्य उत्पादन शुल्क कार्यालयावर मंगळवारी धडक दिली.

'Swaminar' hit on excise | ‘स्वामिनी’ची एक्साईजवर धडक

‘स्वामिनी’ची एक्साईजवर धडक

दारूबंदीची मागणी : जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनाही निवेदन
यवतमाळ : जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी व्हावी यासाठी स्वामिनी जिल्हा दारूबंदी अभियानाच्या महिलांनी राज्य उत्पादन शुल्क कार्यालयावर मंगळवारी धडक दिली. उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू विके्रत्यांची कशी पाठराखण केली जाते, याचा पाढाच उत्पादन शुल्क अधीक्षकांपुढे वाचला. त्यानंतर जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांना निवेदन दिले.
स्वामिनीच्या दारूबंदी अभियानाची व्याप्ती जिल्ह्यात वाढत आहे. मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग मिळत असल्याने या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा स्थितीत ही चळवळच दडपून टाकण्याचा डाव आहे. दारूमुळे संसार उद्धवस्त झालेल्या महिलांची ही चळवळ आहे. त्यांचा आवज दडपण्याचा प्रयत्न कोणीही करून नये, असा इशारा या महिलांनी यावेळी दिला. जोडमोहा येथील दारू दुकान बंद करण्यासाठी महिलाचा ठराव झाला आहे. मात्र मतदान घेण्याकरिता टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करण्यात आला.
या आंदोलनाचे नेतृत्व संयोजक महेश पवार यांनी केले. या आंदोलनामध्ये प्रज्ञा चौधरी, मनीषा काटे, रिना घावडे, भावना नव्हाते, अजय आरेवार, बालाजी कदम, पार्वता भंडारवार, सुषमा गाढवे, सुनीता भालेराव, लता चौधरी, अनंतराव काटकोजवार, शेखर सरकटे, प्रशांत भोयर, पवन जाधव, सागर मुन, सुशीला रोपटे, वनिता नागपूरे, शोभा गेडाम आदी महिला सहभागी झाल्या होत्या. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: 'Swaminar' hit on excise