‘त्या’ चार पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन

By Admin | Updated: January 28, 2015 23:41 IST2015-01-28T23:41:43+5:302015-01-28T23:41:43+5:30

शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेला खुनातील न्यायाधीन बंदी (आरोपी) पसार झाल्याच्या घटनेत कर्तव्यावरील चार पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले.

The suspension of those 'four police personnel' | ‘त्या’ चार पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन

‘त्या’ चार पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन

यवतमाळ : शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेला खुनातील न्यायाधीन बंदी (आरोपी) पसार झाल्याच्या घटनेत कर्तव्यावरील चार पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी मंगळवारी रात्री उशिरा या संदर्भात आदेश काढले.
जमादार अरुण लवटे, शिपाई अंकुश शेळके, राजेंद्र नागमोते, समाधान धायभये अशी निलंंबन झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहे. बापूराव बारीकराव दडांजे रा. चपराहा जि. आदिलाबाद हा पांढरकवडा येथील न्यायालयाच्या आदेशाने येथील जिल्हा कारागृहात खुनाच्या आरोपात न्यायाधीन बंदी होता. शस्त्रक्रिया आटोपून ठणठणीत होताच बारीकरावने पोलिसांची नजर चुकवून हातकडीतून शिताफीने हात बाहेर काढला. त्यानंतर रुग्णालयातून त्याने धूम ठोकली. तो दिसेनासा झाल्यावर ही बाब पोलिसांच्या लक्षात आली. सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेनंतर शोध घेऊनही बारीकराव पोलिसांच्या हाती लागला नाही. संबंधित चौघांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत तडकाफडकी निलंबित केले. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: The suspension of those 'four police personnel'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.