विस्तार अधिकाऱ्यासह दोघे निलंबित

By Admin | Updated: March 4, 2016 02:32 IST2016-03-04T02:32:38+5:302016-03-04T02:32:38+5:30

ग्रामपंचायतींची मागणी नसताना कागदोपत्री घंटागाडी खरेदी करणाऱ्या विस्तार अधिकाऱ्यासह सहाय्यक लेखाअधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले.

Suspended both with extension officer | विस्तार अधिकाऱ्यासह दोघे निलंबित

विस्तार अधिकाऱ्यासह दोघे निलंबित

यवतमाळ पंचायत समिती : घंटागाडी खरेदीचेप्रकरण
यवतमाळ : ग्रामपंचायतींची मागणी नसताना कागदोपत्री घंटागाडी खरेदी करणाऱ्या विस्तार अधिकाऱ्यासह सहाय्यक लेखाअधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. ही कारवाई जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी केली. यवतमाळ पंचायत समितीतील हा अपहार माहिती अधिकारातून उघडकीस आला होता.
पंचायत विस्तार अधिकारी संजय ईश्वरकर आणि सहाय्यक लेखाअधिकारी चंद्रशेखर राऊत असे निलंबित झालेल्यांची नावे आहेत. घंटागाडी खरेदी प्रक्रिया करताना कोणत्याच नियमांचे पालन केले नाही. ज्या पुरवठादार एजन्सीकडून घंटागाडी घेण्यात आली. तिच्याकडे कोणतेच आवश्यक कागदपत्र नाहीत. शिवाय धनादेश देताना ४ टक्के व्हॅट कापण्यात आला नाही. २०१२-१३ या वर्षात २६ गाड्या २४ हजार ९९० रूपये दराने तर २०१३-०१४ मध्ये १० गाड्या २५ हजार रुपये दराने खरेदी करण्यात आल्याचे दाखविले आहे. हा अपहार संजय चव्हाण यांनी माहिती अधिकारातून उघडकीस आणला. त्यानंतर यावर विधासभेत लक्षवेधी लावण्यात आली होती. त्यावरून जिल्हा परिषद पंचायत विभागाने चौकशी समिती नेमून संपूर्ण प्रकरणात दोषी कोण याचा शोध घेतला. त्याचा अहवाल मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पंचायत विस्तार अधिकारी व सहाय्यक लेखाअधिकारी यांचे निलंबन केले. त्यानंतर या अधिकाऱ्यांची कार्यालयीन चौकशी लावण्यात येणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Suspended both with extension officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.