शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या गुन्ह्यांमध्ये नव्या चेहऱ्यांवर संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 06:00 IST

जिल्ह्यात ‘प्रॉपर्टी ऑफेन्सेस’ची संख्या वाढत आहे. मोठ्या व गंभीर गुन्ह्यांच्याच तेवढ्या तक्रारी होतात. छुटपुट प्रकरणे तर पोलीस ठाण्यापर्यंतही येत नाहीत. ऑनलाईन एफआयआर, लिंक नसणे, त्यासाठी वारंवार चकरा माराव्या लागणे अशा कारणांमुळे नागरिक चोरीची घटना घडूनही फिर्याद देणे टाळतात.

ठळक मुद्देखुफिया, विशेष शाखा, ‘एसआयडी’चे अपयश : अद्याप रेकॉर्डवर न आलेल्यांच्या मागावर पोलीस

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात चोरी, घरफोडी, वाटमारी या सारख्या मालमत्तेशी संबंधित गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. या गुन्ह्यांचे डिटेक्शन करताना रेकॉर्डवरील गुन्हेगारांवरच पोलीस लक्ष केंद्रीत करतात. मात्र त्यानंतरही यश येत नाही. त्यामुळे चोरी-घरफोडीच्या या गुन्ह्यांमध्ये आता नवखे तरुण सक्रिय झाल्याचा व अद्याप ते रेकॉर्डवर न आल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांची विविध पथके अशा नव्या चेहऱ्यांच्या मागावर आहेत.जिल्ह्यात ‘प्रॉपर्टी ऑफेन्सेस’ची संख्या वाढत आहे. मोठ्या व गंभीर गुन्ह्यांच्याच तेवढ्या तक्रारी होतात. छुटपुट प्रकरणे तर पोलीस ठाण्यापर्यंतही येत नाहीत. ऑनलाईन एफआयआर, लिंक नसणे, त्यासाठी वारंवार चकरा माराव्या लागणे अशा कारणांमुळे नागरिक चोरीची घटना घडूनही फिर्याद देणे टाळतात. अनेकदा गुन्ह्यांची संख्या कमी करण्याच्या छुप्या हेतुनेसुद्धा तक्रारकर्त्याला ‘लिंक नाही, लिंक फेल आहे’ अशी ठेवणीतील कारणे सांगितले जाते. पुन्हा-पुन्हा येऊनही फिर्याद दाखल होत नसल्याने अखेर नागरिक तक्रार नोंदविण्याचा नाद सोडतात. त्यातूनच गुन्हे दाखल होण्याची संख्या कमी होते.कुठेही चोरी-घरफोडीच्या घटना घडल्या की, पोलीस गुन्ह्याची पद्धत तपासून संबंधित रेकॉर्डवरील गुन्हेगारांना शोधतात. अनेकदा त्यांना अटक करूनही त्यांच्याकडून जप्ती होत नाही. वरिष्ठांचा ‘डिटेक्शन’चा तगादा कमी होण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांना करंट गुन्ह्यात दाखविण्याचे प्रकारही घडतात. अनेक प्रकरणात गुन्ह्यांची नवी पद्धत वापरली गेल्याचे घटनास्थळ पंचनामा करताना पोलिसांना आढळून आले. काही चोºयांमध्ये चक्क चारचाकी वाहनांचा वापर झाला. ते पाहता जिल्ह्यात चोरी-घरफोडी, वाटमारींच्या घटनांमध्ये नवख्या युवकांचा शिरकाव झाला असावा, असा दाट संशय डिटेक्शन करणाऱ्या पोलिसांना आहे. त्यामुळेच त्यांनी अशा नव्या चेहºयांचा माग काढणे सुरू केले आहे. वास्तविक गुन्हेगारी वर्तुळात नव्याने सक्रिय झालेल्या टोळ्यांबाबत पोलीस ठाण्यातील खुफिया कर्मचारी, जिल्हा विशेष शाखा व राज्य गुप्तवार्ता विभागाच्या यंत्रणेकडून गोपनीय माहिती मिळणे अपेक्षित असते. परंतु प्रत्यक्षात ही यंत्रणा या कामी फेल ठरल्याचे दिसते. चोरीत सक्रिय नवखे चेहरे अद्याप रेकॉर्डवर न आल्याने पोलिसांची कोंडी झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी महागडे मोबाईल वापरणाऱ्या, बीअरबारमध्ये वारेमाप खर्च करणाºया, मुलींना सोबत फिरविणाऱ्या, महागडे बुट, कपडे खरेदी करणाऱ्या टपोरी युवकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. या वाढलेल्या गरजा हे युवक नेमके कोणत्या कमाईतून पूर्ण करतात, यावर ‘वॉच’ ठेवला जात आहे. अशा नवख्या टोळीचा पर्दाफाश करण्याचे आव्हान डीबी स्कॉड, स्थानिक गुन्हे शाखा आणि एसपींच्या विशेष पथकांपुढे आहे. गुन्हेगारी वर्तुळातील हे नवे चेहरे रेकॉर्डवर आल्यास अनेक गंभीर गुन्हे व त्यांच्या नव्या पद्धती उघडकीस येण्यास मदत होणार आहे.कारागृहातच शिजतो चोरी-घरफोडीचा कटअनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयीन कोठडी अंतर्गत आरोपींची कारागृहामध्ये रवानगी होते. तेथे नवे-जुने अनेक गुन्हेगार एकत्र भेटतात. बाहेर आल्यावर नेमका कुठे हात मारायचा, कुठे भेटायचे, गुन्हा घडल्यानंतर कुठे पळून जायचे, कुणामार्फत मुद्देमाल विकायचा, हिस्सेवाटणी कशी करायची आदी बाबींचे ‘प्लॅनिंग’ कारागृहातच केले जात असल्याची पोलिसांची माहिती आहे. त्यामुळेच एखादा अट्टल गुन्हेगार कारागृहातून सुटल्यानंतर संबंधित पोलीस अनेक दिवस त्याच्या हालचालींवर नजर ठेऊन असतात. कारागृहात शिजणारे हे कट आधीच उधळून लावण्यासाठी पोलिसांनी आता कारागृहातील अनेक बराकींमध्येही आपले ‘खबरे’ पोसले असल्याचे सांगितले जाते.जिल्ह्याबाहेरील टोळ्यांवरही संशयजिल्ह्यात घडलेल्या काही गुन्ह्यांमध्ये जिल्ह्याबाहेरील गुन्हेगारांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले. पुसदमधील घटनेत ही बाहेरील गँग रेकॉर्डवर आली. त्यामुळे यवतमाळ व इतरत्र घडलेल्या गुन्ह्यांमध्येही जिल्ह्याबाहेरील टोळीचा हात आहे काय? या दृष्टीने तपास केला जात आहे. अशा टोळ्यांमध्ये स्थानिक भौगोलिक स्थितीचा अभ्यास असलेले एक-दोन गुन्हेगार सहभागी राहत असल्याचेही आढळून आले आहे.

टॅग्स :Thiefचोर