शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

जिल्हा कचेरीत कचऱ्यावर ‘सर्जिकल स्ट्राईक’

By admin | Updated: May 5, 2017 02:12 IST

पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत मिशनचे मोल गावखेड्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी ज्या जिल्हा प्रशासनाच्या खांद्यावर आहे,

लोकजागृती मंचचे आंदोलन : नव्या कोऱ्या इमारतीत दारूच्या बाटल्या, धूळ आणि जळमटं, सर्वत्र विखुरलेला कचरा यवतमाळ : पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत मिशनचे मोल गावखेड्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी ज्या जिल्हा प्रशासनाच्या खांद्यावर आहे, त्याच प्रशासनाच्या दिव्याखाली अंधार असल्याची बाब गुरूवारी चव्हाट्यावर आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतींमध्ये धूळ आणि कचऱ्याचा तर खच आहेच; पण सोबतीला दारूच्या बॉटलही विखुरलेल्या आहेत. लोकजागृती मंचच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’ स्टाईल सफाई आंदोलनाने नव्या कोऱ्या प्रशासकीय इमारतींमधली धूळ आणि सुस्तावलेल्या प्रशासनाची झोप उडविली. दीडशे कार्यकर्त्यांची हुलकावणी शेवटच्या क्षणापर्यंत आंदोलनाची वाच्यता न करता लोकजागृती मंचचे शंभर-दीडशे कार्यकर्ते दुपारी एकच्या सुमारास जिल्हा कचेरी परिसरात शिरले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात विविध विभागांची कार्यालये सुसज्ज प्रशासकीय इमारतींमध्ये आहेत. तब्बल पाच कोटी खर्चून बांधण्यात आलेल्या या इमारतींच्या भोवती दारूच्या बाटल्यांचा खच कार्यकर्त्यांना आढळून आला. ठिकठिकाणी सापडणाऱ्या या बाटल्या कार्यकर्त्यांनी गोळा केल्या. खर्ऱ्याच्या पन्न्यांचा ढिग केला. प्रशासकीय इमारत की कचरा डेपो? माजी जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार यांच्या नेतृत्वात सर्वांनी हाती झाडू घेऊन संपूर्ण परिसर साफ केला. विविध कार्यालयांमध्ये जाऊन कोपरान् कोपरा झाडून काढला. त्यावेळी सर्वत्र नुसते धुळीचे लोट उठत होते. जिल्हा कचेरीच्या भिंतींवर, जिन्यावर पान खाऊन पिचकाऱ्या मारलेल्या आहेत. कॉरिडॉर धुळीने माखलेला आहे. एकेका कार्यालयात लोकजागृती मंचचे कार्यकर्ते झाडू घेऊन शिरत होते, तेव्हा उपस्थित कर्मचारी मख्खपणे त्यांची सफाई पाहात होते. हे काय चाललेय, असे विचारण्याची तसदी एकाही कर्मचाऱ्याने घेतली नाही. कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे नवी कोरी प्रशासकीय इमारत कचरा डेपो बनल्याचे दृश्य समोर आले. स्वच्छ भारत मिशनची लावली वाट जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांना नुकताच उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून राज्य शासनातर्फे पुरस्कार देण्यात आला आहे. मात्र, त्यांच्याच कार्यालयात स्वच्छ भारत मिशनची वाट लावली जात आहे. जिल्हा प्रशासनाला मिळालेल्या पुरस्काराचा सन्मान राखायचा असेल तर जिल्हाधिकारी कार्यालयात दुर्गंधी, कचरा नसला पाहिजे. म्हणून आम्ही हे आंदोलन केले, असे देवानंद पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष शनिवारी मुख्यमंत्री जिल्ह्यात येत आहेत. ते या अस्वच्छतेच्या प्रश्नावर काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले. आता कोण कुणाला नोटीस देणार? जिल्हाधिकारी, तहसीलदार एखाद्या गावात गेले आणि तेथे अस्वच्छता आढळली की, ते गावकऱ्यांना नोटीस देतात. आता जिल्हा कचेरीतील अस्वच्छतेबाबत कोण कुणाला नोटीस देणार, असा सवालही देवानंद पवार यांनी उपस्थित केला. या आंदोलनात माजी सभापती शैलेश इंगोले, शालिकराव चवरडोल, हेमंत कांबळे, गोपाल चव्हाण, प्रदीप डंभारे, अजय डहाके, प्रवीण गुघाणे, मिथून अलाढे, अरविंद पाटील महल्ले, सुभाष नित आदी सहभागी झाले होते. (स्थानिक प्रतिनिधी)