तरुण शेतक-याची आत्महत्या
By Admin | Updated: April 4, 2017 14:56 IST2017-04-04T14:56:46+5:302017-04-04T14:56:46+5:30
नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून 32 वर्षांच्या तरुण शेतक-याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली आहे.

तरुण शेतक-याची आत्महत्या
ऑनलाइन लोकमत
उत्तरवाढोणा (यवतमाळ), दि. 4 - नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून 32 वर्षांच्या तरुण शेतक-याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली आहे. नेर तालुक्यातील उत्तरवाढोणा येथे मंगळवारी ही घटना घडली आहे. अतुल नारायण नरोटे असे आत्महत्या करणा-या शेतक-याचं नाव आहे.
या शेतक-यावर सेंट्रल बँकेचे 40 हजार रुपयांचं कर्ज होतं. या कर्जाची परतफेड कशी करायची, याच तणावात ते गेले काही दिवस होते. याच तणावात त्यांनी मंगळवारी सकाळी राहत्या घरी बैलाच्या वेसणीने गळा आवळून आत्महत्या केली. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन मुली व मोठा आप्त परिवार आहे.