शाळकरी विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
By Admin | Updated: June 20, 2017 01:16 IST2017-06-20T01:16:34+5:302017-06-20T01:16:34+5:30
आईसह मामाकडे वास्तव्याला असलेल्या एका शाळकरी विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना तालुक्यातील कलगाव येथे सोमवारी दुपारी ४.३० वाजता उघडकीस आली.

शाळकरी विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
कलगावची घटना : आईसह मामाकडे होते वास्तव्य
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : आईसह मामाकडे वास्तव्याला असलेल्या एका शाळकरी विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना तालुक्यातील कलगाव येथे सोमवारी दुपारी ४.३० वाजता उघडकीस आली.
आकाश प्रकाश नरवाडे (१५) असे मृताचे नाव असून तो कलगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आठव्या वर्गात शिकत होता. आईने घटस्फोट घेतल्याने आकाशसह ती कलगाव येथे राहत होती. सोमवारी सकाळी तो गुरे घेऊन शेतात गेला होता. दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास गावानजीकच्या एका शेतात त्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. हा प्रकार माहीत होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नेमकी आत्महत्या कोणत्या कारणाने केली हे मात्र कळू शकले नाही. महागाव पोलिसांनी पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी सवनाच्या ग्रामीण रुग्णालयात रवाना केले. या घटनेने महागाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.