यवतमाळ जिल्ह्यात कर्जापायी उपसरपंचांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 12:43 IST2020-01-17T12:42:43+5:302020-01-17T12:43:16+5:30
सततची नापिकी व बँकेचे कर्ज, यामुळे वैतागून वणी तालुक्यातील वारगाव येथील उपसरपंच एकनाथ महादेव डाखरे (५५) यांनी शुक्रवारी सकाळी ७ वाजता स्वत:च्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली.

यवतमाळ जिल्ह्यात कर्जापायी उपसरपंचांची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सततची नापिकी व बँकेचे कर्ज, यामुळे वैतागून वणी तालुक्यातील वारगाव येथील उपसरपंच एकनाथ महादेव डाखरे (५५) यांनी शुक्रवारी सकाळी ७ वाजता स्वत:च्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्यावर सोसायटीचे दीड लाख व काही खासगी कर्ज होते. यावर्षी अवकाळी पावसाने शेती उद्ध्वस्त झाली. त्यामुळे कर्जाची परतफेड कशी करावी, या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून असा आप्त परिवार आहे.