शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विषारी औषध प्राशन करून प्रेमी युगुलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 05:00 IST

विशाल गेल्या दोन ते चार वर्षांपासून कामानिमित्त बोंडगव्हाण येथे पूनम हिच्या घरी वास्तव्याला असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे पूनमची आई नात्याने विशालची मावशी आहे. तेथील वास्तव्यात त्यांचे प्रेमसंबंध फुलले. मात्र, नात्याने ही बाब शक्य नसल्याचे दोघांच्याही लक्षात आले असावे, त्यामुळे दोघेही सोमवारीच घर सोडून गेल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यानंतर बुधवारी ते या परिसरात आले. येथेच त्यांनी विषारी द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपविली.  

लोकमत न्यूज नेटवर्कसावळी सदोबा : आर्णी तालुक्यातील वरूड (तुका) परिसरातील जंगलात प्रेमी युगुलाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. विशाल दत्ता आगीरकर (२८, रा. राणी धानोरा, ता. आर्णी) व पूनम संजय राऊत (१८, रा. बोंडगव्हाण, ता. माहूर, जि. नांदेड), अशी मृत प्रेमी युगुलाची नावे आहेत. गुरुवारी  दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास परिसरातील गुढाई टेकडीजवळ दोघांचेही मृतदेह आढळले. गुढा येथील पोलीस पाटील नितीन खोडे यांनी याबाबत पारवा पोलिसांना माहिती दिली. सहायक फौजदार गजानन शेजूलकार, हवालदार सुरेश येलपूलवार यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केले. मृत विशाल आणि पूनम यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे सांगितले जाते. हे दोघेही बुधवारी रात्री या परिसरात आल्याचे व आत्महत्या केल्याचा  संशय पोलिसांनी व्यक्त केला. गुरुवारी दुपारी मृतदेह आढळल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पारवा पोलिसांनी तूर्तास अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.गुरुवारी दुपारी  घटनास्थळी पूनमची आई आणि विशालचे वडील दाखल झाले होते. त्यांनीच दोघांची ओळख पटविली. दरम्यान, विशाल गेल्या दोन ते चार वर्षांपासून कामानिमित्त बोंडगव्हाण येथे पूनम हिच्या घरी वास्तव्याला असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे पूनमची आई नात्याने विशालची मावशी आहे. तेथील वास्तव्यात त्यांचे प्रेमसंबंध फुलले. मात्र, नात्याने ही बाब शक्य नसल्याचे दोघांच्याही लक्षात आले असावे, त्यामुळे दोघेही सोमवारीच घर सोडून गेल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यानंतर बुधवारी ते या परिसरात आले. येथेच त्यांनी विषारी द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपविली.  घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. 

घटनास्थळी विषाची बाटली - घटनेची माहिती समजल्यानंतर पारवा पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेवून घटनास्थळाचा पंचनामा केला. तेथे विषाची रिकामी बाटली, दोघांच्याही चपला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, पर्स आदी वस्तू आढळल्या. विषाची बाटली आढळल्याने त्यांनी आत्महत्याच केल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला. 

बोंडगव्हाण येथील तरुणी संदर्भात सिंदखेड पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याबाबतची तक्रार नाही. मात्र, तरुणीने गुढाई टेकडीजवळ आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर गावात माहिती घेतली. मृत विशाल आणि पूनम दोघेही सख्खे मावस भाऊ-बहीण असल्याचे समजले. बोंडगव्हाण आणि राणी धानोरा या गावातील अंतर साडेतीन किलोमीटर एवढे आहे. प्रेमप्रकरणातून आत्महत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. - भालचंद्र तिडकेसहायक पोलीस निरीक्षक, सिंदखेड, ता. माहूर

 

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिस