अध्यक्ष निवडीसाठी सर्वपक्षीय बैठक
By Admin | Updated: June 9, 2017 01:38 IST2017-06-09T01:38:31+5:302017-06-09T01:38:31+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रभारी अध्यक्ष निवडीसाठी गुरुवारी पक्षीय अभिनिवेश बाजूला सारुन काँग्रेस,

अध्यक्ष निवडीसाठी सर्वपक्षीय बैठक
जिल्हा बँक : पक्षीय अभिनिवेश बाजूला, नेते आले एकत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रभारी अध्यक्ष निवडीसाठी गुरुवारी पक्षीय अभिनिवेश बाजूला सारुन काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपाचे नेते एकत्र आले. या सर्वांनी प्रभारी अध्यक्षपदासाठी विविध संचालकांच्या नावांची चाचपणी केली.
येथील विश्रामगृहात गुरुवारी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, पालकमंत्री मदन येरावार, राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री व विद्यमान आमदार मनोहरराव नाईक यांच्यासह २२ संचालकांची बैठक झाली. या बैठकीत अध्यक्ष मनीष पाटील यांच्या राजीनाम्यानंतर उद्भवलेल्या स्थितीवर चर्चा करण्यात आली. यानंतर उपस्थित संचालकांमधून नेमके कुणाला अध्यक्ष करायचे यावर विचारमंथन करण्यात आले. मनीष पाटील यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव आणणाऱ्या २२ संचालकांमध्ये अनेक संचालक अध्यक्षपदासाठी उत्सुक आहे. त्यांनी आपआपल्या गॉडफादरकडे अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी केली आहे. यातून सर्वपक्षीय नेत्यांना एका नावावर शिक्कामोर्तब करताना प्रचंड कसरत करावी लागत आहे. भाजपाच्या पठडीतील संचालकाला अध्यक्षपदी बसविण्यासाठी पालकमंत्री येरावार जोर लावून आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मातब्बर संचालकांनाही अध्यक्षपदाची उत्सुकता लागली आहे. या सर्वांमधून नेमके कोण अध्यक्षपदी विराजमान होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. वृत्तलिहिस्तोवर बैठक सुरू होती. त्यात कोणताही निर्णय झाला नाही.