दारूबंदीसाठी ६७० ठराव सादर

By Admin | Updated: June 17, 2015 02:11 IST2015-06-17T02:11:58+5:302015-06-17T02:11:58+5:30

यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी जाहीर करावी, या मागणीसाठी मंगळवारी विविध पक्ष, संस्था व संघटनांनी एकत्र येवून ६७०

Submitted to 670 resolution for drunkenness | दारूबंदीसाठी ६७० ठराव सादर

दारूबंदीसाठी ६७० ठराव सादर

‘स्वामिनी’चा पुढाकार : घाटंजीत पक्ष, संस्था व संघटनांची एकजूट, आंदोलन अधिक तीव्र करणार
घाटंजी : यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी जाहीर करावी, या मागणीसाठी मंगळवारी विविध पक्ष, संस्था व संघटनांनी एकत्र येवून ६७० ठराव येथील तहसीलदारांना सादर केले. ही मोहीम जिल्हाभर राबविली जाणार असून सुरुवात घाटंजीतून करण्यात आली.
पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, चेंबर आॅफ कॉमर्स, वकील संघ, भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनकासे, शिक्षक संघटना, डॉक्टर्स असोसिएशन, गुरुदेव सेवा मंडळ, पत्रकार संघटना यासह तालुक्यातील ग्रामपंचायती, तंटामुक्त गाव समित्या, स्वयंसेवी संस्था, बचत गट, दुर्गोत्सव व गणेशोत्सव मंडळ, छत्रपती महोत्सव समिती, विविध समाज संघटना, महिला मंडळ आदींचे ठराव देण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्त्व ‘स्वामिनी’ अभियानाचे संयोजक महेश पवार आणि घाटंजी तालुका संयोजक अमोल ढगले यांनी केले.
ठराव मोहिमेमध्ये प्रामुख्याने पंचायत समिती सभापती शैलेश इंगोले, बाजार समिती सभापती अभिषेक ठाकरे, भाजपा शहराध्यक्ष विष्णू नामपल्लीवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रजय कडू, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संजय गोडे, शिवसेनेचे शहर अध्यक्ष मनोज ढगले, मनकासेचे जिल्हाध्यक्ष प्रा. घनश्याम दरणे, मदन जिड्डेवार, रिना घावडे, बाळासाहेब शिंदे, राम आईनवार, ज्योत्स्ना आचार्य यांचा सहभाग होता. दारूबंदीसाठी सकारात्मक असलेल्या संस्था व संघटनांनी टपालाद्वारे थेट जिल्हाधिकाऱ्यांना ठराव पाठवून या मोहिमेत सहभागी होण्याची विनंती महेश पवार यांनी केली.
मंगळवारी राबविलेल्या मोहिमेसाठी भावना पाटील, कोमल जाचक, सुशांत भुरे, ललिता ठाकूर, प्रशांत उगले, सिंधु शिरपुरे, अंजली अडेकार, पुष्पा गजबे, साधना माडुरवार, अ‍ॅड. सादिक खान, समीर चौधरी, मोहिनी गोल्हर, रितेश सहारे, कैलास निकोडे, पंकज कोवे, शुभविता कुळसंगे, अजिंक्य मांडवगोडे, सुहासिनी माहुरे, मनीषा तुरके, लता चौधरी, ललिता राठोड, योगिता पवार, रत्नमाला गजघाटे, रेहाना शेख, फरजान शेख सत्तार, माया धुळे, ज्योती वाघाडे, ताई काकडे आदींनी पुढाकार घेतला. जिल्ह्यात दारूबंदी व्हावी यासाठी हाती घेण्यात आलेली मोहीम अधिक तीव्र करण्याचा पवित्रा ‘स्वामिनी’ अभियानातर्फे घेण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Submitted to 670 resolution for drunkenness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.