घाटंजी येथे सुभेदार रामजी आंबेडकर स्मृतिदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:49 AM2021-03-01T04:49:49+5:302021-03-01T04:49:49+5:30

घाटंजी : येथील जय भीम चौकात भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, वंचित बहुजन आघाडी यांच्यावतीने सुभेदार रामजीबाबा ...

Subhedar Ramji Ambedkar Memorial Day at Ghatanji | घाटंजी येथे सुभेदार रामजी आंबेडकर स्मृतिदिन

घाटंजी येथे सुभेदार रामजी आंबेडकर स्मृतिदिन

Next

घाटंजी : येथील जय भीम चौकात भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, वंचित बहुजन आघाडी यांच्यावतीने सुभेदार रामजीबाबा सकपाळ यांचा स्मृतिदिन कार्यक्रम घेण्यात आला.

अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संघपाल कांबळे होते. प्रथम सुभेदार रामजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सामुदायिक वंदना घेण्यात आली. विजय सिसले यांनी प्रास्ताविक केले. श्यामराव मुनेश्वर, एन. जी. भगत यांनी मनोगत व्यक्त केले. बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष संजय कांबळे, बाबाराव भगत, उमेश नगराळे, रा. वि. नगराळे, रंजित नगराळे, रुद्रकुमार रामटेके, प्रदीप रामटेके, मनोहर चांदेकर, अशोक खरतडे, किशोर मुनेश्वर, दादाराव खोब्रागडे, बाबाराव फुटाणे, संतोष ओंकार, शुभम नगराळे आदी उपस्थित होते. संचालन गुलाब सिसले यांनी केले. विरेंद्र पिलावन यांनी आभार मानले.

Web Title: Subhedar Ramji Ambedkar Memorial Day at Ghatanji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.