उपवनसंरक्षकांनी घेतले बेवारस सागवान ताब्यात

By Admin | Updated: March 24, 2015 01:05 IST2015-03-24T01:05:19+5:302015-03-24T01:05:19+5:30

तालुक्यातील येळाबारा सर्कलमध्ये येत असलेल्या वाकी दुधाना येथे तब्बल १४ घनमीटर बेवारस सागवान आढळून

Sub-inspector took possession of the villain | उपवनसंरक्षकांनी घेतले बेवारस सागवान ताब्यात

उपवनसंरक्षकांनी घेतले बेवारस सागवान ताब्यात

येळाबारा सर्कल : वाकी दुधानात सागवान तस्करी
यवतमाळ
: तालुक्यातील येळाबारा सर्कलमध्ये येत असलेल्या वाकी दुधाना येथे तब्बल १४ घनमीटर बेवारस सागवान आढळून आले. विशेष म्हणजे हा माल उपवनसंरक्षक प्रेमचंद लाकरा यांच्या धाडीत हाती लागला. येळाबारा सर्कलमधून यापूर्वीसुद्धा विनापरवाना मोठ्या प्रमाणात सागवान चोरी जात असल्याचे उघड झाले. झुली चौकीचा ट्रक उमरी नाक्यावर पकडण्यात आला होता. या प्रकारावर पडदा पडतो न पडतो तोच आता बेवारस सागवान हाती आले आहे.
वाकी दुधाना येथील १४ घनमीटर बेवारस सागवान मिळाले असून, हे विजय नामक कंत्राटदाराचे असल्याचा संशय व्यक्त होत आहे. यामध्ये स्थानिक अधिकारीही गुंतले असल्याची चर्चा आहे. या लाकडांवर हॅमर मारला असून, उपवनसंरक्षकांकडून सहाय्यक वनसंरक्षकांनी मारलेला हॅमर अस्पष्ट दिसत आहे. हा हॅमर काही लाकडांवरच आहे. अतिरिक्त प्रभार असलेल्या अधिकाऱ्याच्या काळातच हा प्रकार झाला आहे. यापूर्वीसुद्धा महसूलातील वृक्षतोडीची प्रकरणे झाली आहेत. आता तर थेट उपवनसंरक्षकांच्या हाती बेवारस माल लागला आहे. १५ दिवसांपूर्वी तोड झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

Web Title: Sub-inspector took possession of the villain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.