विद्यार्थ्यांनी घेतले पत्रकारितेचे प्राथमिक धडे
By Admin | Updated: February 29, 2016 02:02 IST2016-02-29T02:02:17+5:302016-02-29T02:02:17+5:30
मुक्त विद्यापीठाच्या येथील अमोलकचंद महाविद्यालय अभ्यास केंद्रातील वृत्तपत्र पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी ...

विद्यार्थ्यांनी घेतले पत्रकारितेचे प्राथमिक धडे
यवतमाळ : मुक्त विद्यापीठाच्या येथील अमोलकचंद महाविद्यालय अभ्यास केंद्रातील वृत्तपत्र पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी ‘लोकमत’ जिल्हा कार्यालयाला भेट दिली. याठिकाणी त्यांनी पत्रकारितेतील प्राथमिक माहिती जाणून घेतली.
पत्रकारांचे समाजातील स्थान, महत्त्व आणि जबाबदारी याविषयीची उपयुक्त माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली. ग्रामीण पत्रकारिता, बातमीचे स्रोत, पत्रकारांपुढील आव्हाने याविषयी सांगतानाच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे लोकमत प्रतिनिधींनी दिली. घटना, घडामोडी आदी विषयाचे वृत्तांकन आणि संपादन याविषयीचे कौशल्य सांगण्यात आले.
बातमीचे संपादन झाल्यानंतर मांडणी, आकर्षकता याविषयी सप्रात्यक्षिक माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. यावेळी सतीश नवघरे, रोनल फुलझेले, रोहन बागडे, आकाश बुर्रेवार, विजय देऊळकर, दिनेश करलुके, शेखर मुत्यालवार, आशीष मिश्रा, जीत पांडे, गजेंद्रसिंग ठाकूर, धनराज तिरमनवार, अतुल वानखडे, रिता येंडे, गजानन अन्नेलवार, अभ्यासक्रम प्रमुख प्रा. नीलेश भगत, प्रा. काशीनाथ लाहोरे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)