शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
5
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
6
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
7
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
9
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
10
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
11
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
13
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
14
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
15
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
16
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
17
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
18
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
19
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
20
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य

फुलसावंगीच्या विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषदेत ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 21:23 IST

महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील शाळेवर शिक्षकांची नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी विद्यार्थी व पालकांनी जिल्हा परिषदेत शिक्षण विभागासमोर ठिय्या दिला. दुपारी विद्यार्थी व पालकांनी वऱ्हांड्यातच भोजनही केले.

ठळक मुद्देवऱ्हांड्यातच भोजन : गरज १३ शिक्षकांची, मिळाले केवळ तीनच

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील शाळेवर शिक्षकांची नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी विद्यार्थी व पालकांनी जिल्हा परिषदेत शिक्षण विभागासमोर ठिय्या दिला. दुपारी विद्यार्थी व पालकांनी वऱ्हांड्यातच भोजनही केले.फुलसावंगी येथे जिल्हा परिषदेची केंद्रीय प्राथमिक मराठी शाळा आहे. या शाळेत पहिली ते चौथीपर्यंत ३१५ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. शिक्षकांची एकूण १३ पदे मंजूर आहे. मात्र सध्या केवळ तीनच शिक्षक कार्यरत असून एकाकडे मुख्याध्यापक पदाचा प्रभार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक हेळसांड होत आहे. शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी वारंवार पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे शिक्षकाची मागणी केली. शाळेला कुलूपही ठोकले. मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही.शुक्रवारी एका ट्रॅव्हल्समधून पालक व शिक्षकांनी जिल्हा परिषद गाठली. प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला. शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांना घेराव घालून शिक्षकांची मागणी केली. त्यानंतर पालकांनी पदाधिकारी व सीईओंकडे धाव घेतली. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र पांढरे, संतोष बाजपेयी, दत्ता खंदारे, गणेश भगत, अमर दळवे, प्रशांत महाजन यांच्यासह महिला, पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना धारेवर धरले. अनेक विद्यार्थी शिक्षकांअभावी शाळा सोडून जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. संतप्त पालकांनी लेखी आश्वासन देईपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. शिक्षणाधिकाऱ्यांनी त्वरित चार शिक्षक देण्याची ग्वाही दिल्याने पालकांनी आंदोलन मागे घेतले.फुलसावंगी प्रमाणेच जिल्ह्यातील अनेक मोठ्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याने वारंवार विद्यार्थ्यांची आंदोलने होत आहे. याच पंधरवड्यात सावरगाव (घाटंजी) येथील विद्यार्थ्यांनी बँड वाजवित रास्ता रोको केला होता.

टॅग्स :Studentविद्यार्थीTeacherशिक्षक