वसतिगृह प्रमुखाला विद्यार्थ्यांनी डांबले

By Admin | Updated: September 5, 2014 00:07 IST2014-09-05T00:07:20+5:302014-09-05T00:07:20+5:30

साठा उपलब्ध असताना शैक्षणिक साहित्याचा पुरवठा न केल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी चक्क वसतिगृहाच्या गृहपालालाच तास भर डांबून ठेवले. ही घटना येथील एकात्मिक आदिवासी विकास

The students of the hostel were stalled | वसतिगृह प्रमुखाला विद्यार्थ्यांनी डांबले

वसतिगृह प्रमुखाला विद्यार्थ्यांनी डांबले

पुसदची घटना : पुरवठा न करणे भोवले
पुसद : साठा उपलब्ध असताना शैक्षणिक साहित्याचा पुरवठा न केल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी चक्क वसतिगृहाच्या गृहपालालाच तास भर डांबून ठेवले. ही घटना येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत सुरू असलेल्या शासकीय आदिवासी विद्यार्थी वसतिगृहात गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.
येथील शनिमंदिराजवळ शासकीय आदिवासी वसतिगृह असून लोखंडी हे गृहपाल आहे. येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शासनाच्या सर्व सोईसुविधा पुरविल्या जातात. पाचवी ते पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण घेणारे विद्यार्थी या ठिकाणी आहेत. यातील बीए व एमएसडब्ल्यूचे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी असल्याने त्यांना पुस्तकाचे संच शासनाकडून पुरविण्यात यावे असे सांगण्यात आले. परंतु विद्यार्थ्यांना साहित्य पुरविण्यात आले नाही. तसेच विद्यार्थ्यांशी गृहपाल असभ्य वर्तन करतात, असा आरोप आहे. या प्रकाराने संतापलेल्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास गृहपाल भाऊ खोडके यांना कार्यालयात डांबून ठेवले.
या घटनेने एकच खळबळ उडाली. परिस्थतीचे गांभीर्य ओळखून प्रकल्प अधिकारी उल्हास सकवान, अधीक्षक बावणे, समितीचे अध्यक्ष सुरेश धनवे यांनी घटनास्थळ गाठले. या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर गृहपाल खोडके यांना मुक्त करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: The students of the hostel were stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.