विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

By Admin | Updated: November 29, 2014 23:29 IST2014-11-29T23:29:23+5:302014-11-29T23:29:23+5:30

येथील शासकीय माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेत समस्यांचा डोंगर निर्माण झाला आहे. परिणामी विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला असून याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.

The students of the ground floor | विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

आश्रमशाळा : बोटोणीत समस्यांचा डोंगर, उपाययोजनांची कमतरता
रमेश झिंगरे - बोटोणी
येथील शासकीय माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेत समस्यांचा डोंगर निर्माण झाला आहे. परिणामी विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला असून याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व शैक्षणिक प्रवाहात येण्यासाठी, आदिवासी विकास विभाग नाशिकद्वारा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडाअंतर्गत सन १९७२ पासून येथे शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा चालविली जाते. पहिली ते बारावीपर्यंत आदिवासी विद्यार्थ्यांकरिता येथे शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
शासनाकडून आदिवासी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र या आश्रमशाळेतील विद्यार्थी भौतिक व शैक्षणिक सुविधांपासून वंचित आहेत. येथे माध्यमिकचे २६०, तर उच्च माध्यमिकचे १२१, असे एकूण ३८१ विद्यार्थी निवासी शिक्षण घेतात. यात १५८ विद्यार्थी व १३३ विद्यार्थिनी निवासी राहतात. या सर्व विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
इलेक्ट्रीक बोर्ड फुटलेले
सभागृह, वर्ग खोलीतील इलेक्ट्रीक बोर्ड, बटना फुटल्याने वीज प्रवाहित तारा उघड्या आहेत. स्वयंपाक गृहातून विहिरीतील मोटार पंपाला वीज पुरवठा केला जातो. या वीज प्रवाहित केबलवर विद्यार्थी कपडे वाळू घालतात. मागील ७-८ वर्षांपूर्वी खिडकीवरील वीज तारेला हात लावण्याची मुलींमध्ये शर्यत लागली होती. यात एका मुलीला जीव गमवावा लागला होता. तत्कालीन मुख्याध्यापकाला व कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले होते.
येथे आठवीला हिंदी व विज्ञान विषय शिकविण्यासाठी शिक्षक नाही. अकरावी व बारावी विज्ञान शाखेला भौतिकशास्त्र विषय शिकवायला शिक्षक नाही. सातपैकी चार कामाठी सेवानिवृत्त झाले, तर सातपैकी चार स्वयंपाकी सेवानिवृत्त झाले. केवळ तीन शिक्षकेतर कर्मचारी असल्याने भोजन कक्षात कचरा दिसून येतो.

Web Title: The students of the ground floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.