वणीत स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 01:19 AM2019-09-17T01:19:21+5:302019-09-17T01:19:51+5:30

शासनाने सुरू केलेले महापरीक्षा पोर्टल हे संशयास्पद आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून महापरीक्षा हे पोर्टल बंद करण्यात यावे, ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणारी परीक्षा बंद करून पूर्वीप्रमाणे ऑफलाईन व एकाच दिवशी घेण्यात यावी, परीक्षा पेपर राज्यभर एका प्रकाराच्या पदासाठी एकच असावा,

Students' Competition in Wani | वणीत स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा मोर्चा

वणीत स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा मोर्चा

Next
ठळक मुद्देसंभाजी ब्रिगेडचे नेतृत्व : महापरीक्षा पोर्टल संशयास्पद असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप


लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारी संभाजी ब्रिगेड व स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.
शासनाने सुरू केलेले महापरीक्षा पोर्टल हे संशयास्पद आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून महापरीक्षा हे पोर्टल बंद करण्यात यावे, ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणारी परीक्षा बंद करून पूर्वीप्रमाणे ऑफलाईन व एकाच दिवशी घेण्यात यावी, परीक्षा पेपर राज्यभर एका प्रकाराच्या पदासाठी एकच असावा, पोलीस भरती प्रक्रिया शासन निर्णय २०१८ रद्द करून पूर्वीच्या शासन निर्णयानुसार भरती प्रक्रिया घेण्यात यावी, शिक्षक भरतीमध्ये पवित्र पोर्टलद्वारे झालेला गोंधळ निकाली काढून शिक्षकांची भरती करावी, एमपीएससीप्रमाणे लेखी परीक्षा घेऊन उत्तरपत्रिकेच्या कार्बन कॉपी देण्यात याव्या, महागडे परीक्षा शुल्क कमी करून ते १०० रूपयापर्यंतच करण्यात यावे, आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर एसडीओंमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे, तालुकाध्यक्ष विवेक ठाकरे, देव येवले, प्रमोद लडके, अ‍ॅड.अमोल टोंगे, अ‍ॅड.शेखर वºहाटे, आशिष रिंगोले, अनंत मांडवकर आदी उपस्थित होते.

Web Title: Students' Competition in Wani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.