आधारकार्डासाठी विद्यार्थ्यांची भटकंती

By Admin | Updated: July 19, 2015 02:39 IST2015-07-19T02:39:59+5:302015-07-19T02:39:59+5:30

पहिली ते आठवीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला आधारकार्ड काढणे बंधनकारक असल्याबाबतचा अध्यादेश शासनाने काढलेला आहे.

Student wandering for Aadhar card | आधारकार्डासाठी विद्यार्थ्यांची भटकंती

आधारकार्डासाठी विद्यार्थ्यांची भटकंती

पालक चिंताग्रस्त : आधारकार्ड काढण्यासाठी केंद्रांची शोधाशोध
पुसद : पहिली ते आठवीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला आधारकार्ड काढणे बंधनकारक असल्याबाबतचा अध्यादेश शासनाने काढलेला आहे. पुसद तालुक्यात काही ठिकाणी आधार नोंदणी केंद्रच नसल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडत आहे.
आधारकार्डची सक्ती असली तरी ते काढयचे कुठे असा प्रश्न पालकांकडून व्यक्त होत आहे. आधारकार्डचा क्रमांक विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्रमांकाशी जोडला जावा असा शासनाचा मानस आहे. त्यासाठी शाळेत प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांकडून आधार गठीत करण्याचे निर्देश शासनाने दिले असल्याने शालेय स्तरावर आधाराची सक्ती केली जात आहे. मात्र केंद्राअभावी आजही बहुतेक पालक विद्यार्थ्यांना आधार कार्ड काढता आलेले नाही.
२०१४-१५ मध्ये पुसद तालुक्यातील व शहरातील बहुतांश शाळेत विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्यासाठी शाळेने संपूर्ण डाटा जमा केला होता. काही शाळेत फोटोसुद्धा काढण्यात आले तरी अद्यापपर्यंत ‘त्या’ विद्यार्थ्यांना आधारकार्ड मिळाले नाही. याचा शाळेनेसुद्धा पाठपुरावा संबंधितांकडे केलाच नाही. शासनाने सक्ती केल्यानंतर संस्थाचालकांना आधारकार्ड काढण्याची स्वतंत्र व्यवस्था शाळेतच करण्यात यावी. जेणेकरून विद्यार्थ्यांना आधारकार्डासाठी भटकंती करावी लागणार नाही. शाळेने आधारकार्डसाठी माहिती गोळा केली. पण अद्याप विद्यार्थ्यांना आधारकार्ड मिळालेच नाही. तसेच बहुतेक जांनी खासगी ठिकाणी आधारची नोंदणी केलेली आहे. त्याची रितसर पावतीही त्यांना प्राप्त झालेली नाही. मात्र पावतीवरून नोंदणी केलेले आधारच उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांसह अनेक जण आधारकार्डापासून वंचित आहे. एकंदरित आधाराची सक्ती केली तशी आधार काढण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात यावी अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Student wandering for Aadhar card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.