भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले

By Admin | Updated: February 1, 2016 02:15 IST2016-02-01T02:15:03+5:302016-02-01T02:15:03+5:30

स्नेहसंमेलनातून सायकलने घरी परतणाऱ्या एका शाळकरी विद्यार्थ्याला भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना महागाव तालुक्यातील सवना येथे ....

Studded truck hit the student | भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले

भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले

सवना : स्नेहसंमेलनातून सायकलने घरी परतणाऱ्या एका शाळकरी विद्यार्थ्याला भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना महागाव तालुक्यातील सवना येथे रविवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. अपघात एवढा भीषण होता की, विद्यार्थ्याचा मेंदूच बाहेर पडला होता.
प्रतीक सिद्धार्थ खाडे (१४) रा. सवना असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो स्थानिक शिवाजी विद्यालयात आठव्या वर्गात शिकत होता. रविवारी रेनबो शाळेचे स्नेहसंमेलन आयोजित होते. हा कार्यक्रम पाहण्यासाठी तो गेला होता. दुपारी कार्यक्रमानंतर सायकलने परत येत असताना सिंचन वसाहतीजवळ पुसदकडून माहूरकडे जाणाऱ्या ट्रकने त्याला जबर धडक दिली. यात तो ट्रकच्या चाकाखाली चिरडला गेला. हा प्रकार माहीत होताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. प्रतीकच्या अपघाती निधनाने गावावर शोककळा पसरली आहे. (वार्ताहर)

Web Title: Studded truck hit the student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.