लेकराच्या जीवासाठी असहाय मातेचा संघर्ष

By Admin | Updated: May 6, 2016 02:19 IST2016-05-06T02:19:30+5:302016-05-06T02:19:30+5:30

आजाराशी झुंजणाऱ्या आपल्या मुलाचे प्राण वाचविण्यासाठी एका मातेचा पराकोटीचा संघर्ष सुरू आहे.

The struggle of the helpless mother for the leprosy | लेकराच्या जीवासाठी असहाय मातेचा संघर्ष

लेकराच्या जीवासाठी असहाय मातेचा संघर्ष

मदतीचे आवाहन : शस्त्रक्रियेला हवे ३२ लाख
यवतमाळ : आजाराशी झुंजणाऱ्या आपल्या मुलाचे प्राण वाचविण्यासाठी एका मातेचा पराकोटीचा संघर्ष सुरू आहे. आर्थिक परिस्थिती नसल्याने समाजातील दानशुरांनी मदत करावी, असे कळकळीचे आवाहन या मातेने केले आहे.
येथील गिलाणीनगर पोस्ट आॅफिसजवळ राहणाऱ्या शोभा गणेशराव चौधरी या मातेच्या संघर्षाची ही कहाणी आहे. त्यांचा मुलगा प्रतीक चौधरी याला काविळ झाला आहे. काविळ झाल्यामुळे त्याचे यकृत (लिव्हर) निकामी झाल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी निदान केले आहे. त्यांच्या सल्ल्यानुसारच प्रतीकला मुंबईच्या परळ भागातील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्रतीक बरा होण्यासाठी तातडीने यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. यासाठी साधारण ३२ लाख रुपयांचा खर्च असल्याचे डॉक्टरांनी लेखी कळविले आहे. परंतु चौधरी यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने हा खर्च त्यांच्या आवाक्याबाहेर आहे. शस्त्रक्रियेसाठी वेगवेगळ्या माध्यमातून काही प्रमाणात निधी जमा करण्यात आला आहे. परंतु तो अत्यंत अल्प असून आणखी भरीव मदतीची गरज आहे. त्यामुळे समाजातील दानदात्यांना शोभा चौधरी यांनी मदतीचे आवाहन केले आहे. इच्छुकांनी मदतीसाठी शोभा चौधरी यांच्याशी संपर्क साधावा. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: The struggle of the helpless mother for the leprosy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.