शेतीसाठी तंत्रज्ञान मोहिमेचे बळकटीकरण

By Admin | Updated: March 18, 2015 02:22 IST2015-03-18T02:22:54+5:302015-03-18T02:22:54+5:30

सन २०१४-१५ मध्ये कोरडवाहू शेतीसाठी तंत्रज्ञान मोहीम या योजनेला बळकटी देण्याच्या हेतुने कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने ....

Strengthening of Technology for Farming | शेतीसाठी तंत्रज्ञान मोहिमेचे बळकटीकरण

शेतीसाठी तंत्रज्ञान मोहिमेचे बळकटीकरण

यवतमाळ : सन २०१४-१५ मध्ये कोरडवाहू शेतीसाठी तंत्रज्ञान मोहीम या योजनेला बळकटी देण्याच्या हेतुने कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने ७.५० लाख रुपयांच्या रकमेला वित्तीय मान्यता दिली आहे.
राज्यात शेतकऱ्यांची कमी होणारी जमीन धारणा, शेतीसाठी भांडवल पुरवठ्यास आलेल्या मर्यादा, यांत्रिकीकरणास असलेला अपुरा वावत् तसेच जमिनीची कमी होत असलेली उत्पादकता व कृषी विस्तारास सद्यस्थितीत असलेल्या मर्यादा इत्यादी सर्व अनुषंगिक बाबींचा विचार करून गट शेतीस चालना देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा एकत्रित अवलंब करून उत्पादन वाढीचा प्रयत्न करणे व शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला जास्तीत जास्त भाव मिळावा, यासाठी शेतमाल विक्रीची सामूहिक व्यवस्था निर्माण होणे गरजेचे आहे.
कोरडवाहू शेतीसाठी तंत्रज्ञान मोहीम योजना १०० टक्के राज्य पुरस्कृत असून त्याअनुषंगाने कोरडवाहू शेतीसाठी तंत्रज्ञान मोहीम योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्यास सन २०१४-१५ करीता ५० लाख रुपयाला मंजूरीची तरतूद करून त्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. तसेच ३० लाख इतक्या वित्तीय तरतुदीसही मान्यता देण्यात आली आहे. कोरडवाहू शेतीसाठी तंत्रज्ञान मोहीम योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्यासाठी एकूण अर्थसंकल्पित तरतुदींच्या ७५ टक्के मर्यादेत यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाला वगळून आता पुन्हा उर्वरित ७.५० लाख निधीच्या कार्यक्रमास शासनाने १३ फेब्रुवारीच्या निर्णयाद्वारा वित्तीय मान्यता दिली आहे.
सन २०१४-१५ मध्ये कोरडवाहू शेतीसाठी तंत्रज्ञान मोहीम योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आत्माचे संचालक यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. राज्यातील सर्व सबंधित जिल्ह्यांना आवश्यकतेनुसार मंजूर निधीचे वाटप करण्यास व त्याच्या वापराबाबतही मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याचे आत्मा च्या संचालकांना सांगण्यात आले आहे. कोरडवाहू शेतीसाठी तंत्रज्ञान योजनेला यामुळे बळकटीकर देण्याचा प्रयत्न शासनाचा आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Strengthening of Technology for Farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.