उमरखेड येथे शिवनाम सप्ताहाची सांगता
By Admin | Updated: February 22, 2015 02:10 IST2015-02-22T02:10:39+5:302015-02-22T02:10:39+5:30
स्थानिक शिवाजी वॉर्डातील महात्मा बसवेश्वर संस्थानात आयोजित अखंड शिवनाम सप्ताहाची सांगता उत्साहात झाली. प्रसंगी गुरूवर्य रुद्रमुनी शिवाचार्य महाराज (मुदखेड) उपस्थित होते.

उमरखेड येथे शिवनाम सप्ताहाची सांगता
उमरखेड : स्थानिक शिवाजी वॉर्डातील महात्मा बसवेश्वर संस्थानात आयोजित अखंड शिवनाम सप्ताहाची सांगता उत्साहात झाली. प्रसंगी गुरूवर्य रुद्रमुनी शिवाचार्य महाराज (मुदखेड) उपस्थित होते. सप्ताहात गुरूवर्य करबसव शिवाचार्य महाराज (वसमत) यांचे प्रसादाची महती सांगणारे कीर्तन झाले.
राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या प्रेरणेने गेली चार वर्षांपासून येथे शिवनाम सप्ताह घेतला जातो. अभिषेक, आरती, परमरहस्य पारायण, गाथा भजन, शिवपाठ, शिवनाम जप, प्रवचन, शिव कीर्तन, शिव दीक्षा, इष्टलिंग पूजा आदी कार्यक्रमांची रेलचेल यावर्षी होती. गुरूवर्य डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज, गुरूवर्य महादेव शिवाचार्य महाराज, गुरूवर्य रुद्रमुनी शिवाचार्य महाराज यांचे अमृतोपदेश ऐकण्याचे भाग्यही शिवभक्तांना लाभले.
रमेश गणेशपुरे, भूषणस्वामी वाखारीकर, मानखेडकर, राजेश्वर स्वामी लाळीकर, बालकीर्तनकार संगीता मस्कले, कावेरीताई मुरूगबोडे, तानाजी पाटील थोटवाडीकर, अविनाश हाळीघोंगडे यांच्या शिवकीर्तनचा लाभही भक्तांना मिळाला. अन्सिंगचे प्रा.सचिन बिचेवार यांनी बसव तत्त्वावर विचार मांडले.
प्रसादाच्या कीर्तनानंतर करबसव शिवाचार्य महाराज आणि रुद्रमुनी शिवाचार्य महाराज यांचा सत्कार उत्सव समितीतर्फे करण्यात आला. गुरूवर्यांच्या हस्ते अखंड शिवनाम सप्ताहात विशेष योगदान देणारे गायक, वादक, मृतदंगाचार्य, भजनी मंडळातील महिला व पुरुष, विणाधारी, अन्नदाते, आचारी आणि विशेष योगदान देणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रभाकर दिघेवार, शिवहार दुधेवार, रजनीताई वगरकर, पंचाक्षरी खडकेश्वर महाराज, गणेशस्वामी हदगावकर महाराज यांच्यासह महात्मा बसवेश्वर संस्थान, अखंड शिवनाम सप्ताह उत्सव समिती, वीरशैव समाज, वीरशैव महिला मंडळ, किसान गणेश मंडळ, मित्र गणेश मंडळ, बसवेश्वर गणेश मंडळ, छावा गणेश मंडळ आदी संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. (शहर प्रतिनिधी)