नेर तालुक्याला वादळाचा तडाखा

By Admin | Updated: June 10, 2015 02:30 IST2015-06-10T02:30:18+5:302015-06-10T02:30:18+5:30

तालुक्यात सोमवारी सायंकाळी जोरदार वादळाने मांगलादेवी परिसरासह तालुक्याला तडाखा दिला.

Storm of Ner taluka | नेर तालुक्याला वादळाचा तडाखा

नेर तालुक्याला वादळाचा तडाखा

८३ वीज खांब कोसळले : मांगलादेवी परिसरात जोरदार पाऊस
नेर/मांगलादेवी : तालुक्यात सोमवारी सायंकाळी जोरदार वादळाने मांगलादेवी परिसरासह तालुक्याला तडाखा दिला. वादळात अनेक घरांवरील टीनपत्रे उडाली असून अनेक वृक्ष उन्मळून पडली. वीज वितरणचे ८३ खांब कोसळले असून केळी आणि संत्रा पिकाचे प्रचंड नुकसान झाले.
मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास आकाश काळ्या ढगांनी व्यापून गेले. सोसाट्याच्या वाऱ्य्ाांंसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. या वादळाने मांगलादेवी, टाकळी, मंगरुळ आदी गावांना तडाखा दिला.जवळपास २२ मोठ्ठाले वृक्ष तुटून पडले. चिखली, मांगलादेवी, टाकळी, मंगरुळ, आजंती येथील अनेक घरांवरील टीनपत्रे उडाली. अनेक घरे क्षतीग्रस्त झाली. माणिकवाडा येथील प्रेम गवई यांचा फोटो स्टुडिओ व मनोज कातोरे यांच्या पानटपरीवर मोठ्ठा वृक्ष उन्मळला. मंगरुळ येथील वसंत जाधव या शेतकऱ्याच्या शेतातील २२९ केळीची झाडे तुटून गेली.
मांगलादेवी येथील जिल्हा परिषद शाळेवरील टीनपत्रे उडाली. नेर-चिखली मार्गावरील उच्चदाब वाहिनी आणि लघुदाब वाहिनीवरील अनेक खांब तुटल्याने तसेच चार डीपी वाकल्याने संपूर्ण परिसरात अंधाराचे साम्राज्य होते.
नेर परिषदेची सुरक्षा भिंत या वादळात पडली. तसेच वीज खांब तुटल्याने शहराचा वीज पुरवठा खंडित होता. तो रात्री १ वाजताच्या दरम्यान सुरू झाला. ग्रामीण भागात अद्यापही अंधाराचे साम्राज्य असून अनेक ठिकाणी कोसळलेले वृक्ष त्याच स्थिती होते. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरू करणार असल्याचे वीज वितरणचे सहायक अभियंता सतीश कानडे, कनिष्ठ अभियंता जितेंद्र राऊत यांनी सांगितले. तहसील प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Storm of Ner taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.