‘थांबलेले’ उमेदवार पुन्हा ‘चालले’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 06:00 IST2020-01-04T06:00:00+5:302020-01-04T06:00:09+5:30
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे आल्याने निवड झालेल्या उमेदवारांची भरती थांबली होती. आता यासंदर्भात वनविभागाला मार्गदर्शक सूचना मिळाल्या. त्यामुळे आरक्षित जागेवरील उमेदवारांची शुक्रवारी वॉकिंग टेस्ट घेण्यात आली. ही संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओ कॅमेऱ्यात चित्रित करण्यात आली. जिल्ह्यातील ६० पदांसाठी चाचण्या झाल्यावर आरक्षणाच्या वादाने प्रक्रिया थांबली होती.

‘थांबलेले’ उमेदवार पुन्हा ‘चालले’!
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वन विभागाने वनरक्षकाच्या ६० जागांची भरती प्रक्रिया नुकतीच घेतली. मात्र दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत आक्षेप घेण्यात आल्याने यातील अनेक उमेदवारांची भरती प्रक्रिया थांबली होती. आता हे आक्षेप दूर झाले असून शुक्रवारी उमेदवारांची ‘वॉकिंग टेस्ट’ घेऊन पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली.
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे आल्याने निवड झालेल्या उमेदवारांची भरती थांबली होती. आता यासंदर्भात वनविभागाला मार्गदर्शक सूचना मिळाल्या. त्यामुळे आरक्षित जागेवरील उमेदवारांची शुक्रवारी वॉकिंग टेस्ट घेण्यात आली. ही संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओ कॅमेऱ्यात चित्रित करण्यात आली. जिल्ह्यातील ६० पदांसाठी चाचण्या झाल्यावर आरक्षणाच्या वादाने प्रक्रिया थांबली होती. सर्वच बाबतीत पात्र असलेल्या या उमेदवारांची शुक्रवारी १५०० मिटर वॉक टेस्ट घेण्यात आली. ही वॉकिंग प्रक्रिया राबविताना वन विभाग आणि पोलीस प्रशासनाचे कर्मचारी रिंंग रोडवर उपस्थित होते. ही प्रक्रिया अर्धवट राहिल्यामुळे या उमेदवारांची नियुक्ती रखडली होती. वरिष्ठ कार्यालयातील मार्गदर्शनानुसार शुक्रवारी वॉकिंग टेस्ट पूर्ण झाली. आता या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक भानूदास पिंगळे यांनी ‘लोकमत’ला दिली.