पिंपळगाववासीयांचे रास्ता रोको
By Admin | Updated: June 20, 2014 00:06 IST2014-06-20T00:06:11+5:302014-06-20T00:06:11+5:30
विविध समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी पिंपळगाव फाट्याजवळ ग्रामस्थांनी वेकोलिविरुद्ध रास्ता रोको आंदोलन केले. या समस्यांबाबत १० जानेवारीला ग्रामस्थांनी आंदोलन केले. त्यावेळी झालेल्या चर्चेत

पिंपळगाववासीयांचे रास्ता रोको
वणी : विविध समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी पिंपळगाव फाट्याजवळ ग्रामस्थांनी वेकोलिविरुद्ध रास्ता रोको आंदोलन केले.
या समस्यांबाबत १० जानेवारीला ग्रामस्थांनी आंदोलन केले. त्यावेळी झालेल्या चर्चेत २० एप्रिलपर्यंत रस्ता डांबरीकरण करण्याची हमी वेकोलिने दिली. तसेच पिंपळगाव ते बोरगाव रस्त्यालगत धूळ, प्रदूषणाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याची ग्वाही दिली. वेकोलिच्या आश्वासनानुसार त्यावेळी आंदोलन मागे घेण्यात आले. तथापि अद्याप ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी त्याच मागण्यांसाठी पुन्हा आंदोलन केले. या आंदोलनाला उपविभागीय अधिकारी प्रमोद दुबे, तहसीलदार रणजित भोसले, शिरपूरचे ठाणेदार मंडलवार, वेकोलिचे महाप्रबंधक गोखले, क्षेत्रीय योजना अधिकारी मारतंड, अमलाधिकारी कुमार, भाजपा जिल्हा सरचिटणीस विजय पिदुरकर यांनी भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले़
यावेळी वेकोलिने आश्वासन पूर्ण केले नाही, तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य दीपक मत्ते व ग्रामस्थांनी दिला. (कार्यालय प्रतिनिधी)