कृषिमूल्य आयोग रद्दसाठी रास्ता रोको
By Admin | Updated: December 15, 2014 23:09 IST2014-12-15T23:09:35+5:302014-12-15T23:09:35+5:30
कृषिमूल्य आयोग रद्द करावा या प्रमुख मागणीला घेऊन लगतच्या तळेगाव (भारी) येथे सोमवारी सकाळी १० वाजता रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे एक तास वाहतूक ठप्प झाली होती.

कृषिमूल्य आयोग रद्दसाठी रास्ता रोको
यवतमाळ : कृषिमूल्य आयोग रद्द करावा या प्रमुख मागणीला घेऊन लगतच्या तळेगाव (भारी) येथे सोमवारी सकाळी १० वाजता रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे एक तास वाहतूक ठप्प झाली होती. प्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना अशोक भुतडा दत्ता चांदुरे, मोरेश्वर आदमने, परशराम पारधी, सुभाष पातालबन्सी यांनी मार्गदर्शन केले.
कृषी मालाचे भाव ठरविण्यासाठी ज्यात शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीचा समावेश राहील अशी यंत्रणा निर्माण करण्यात यावी, युती सरकारने निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी, पॅकेज न देता तत्काळ मदत जाहीर करावी, हेक्टरी ३० हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. शेतकऱ्यांना कृषी पंपाची वीज जोडणी, सकाळी ८ ते ५ शिवाय नऊ तास योग्य दाबाचा वीज पुरवठा करावा. हमी भावात ५० टक्के वाढ द्यावी, स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू कराव्या आदी मागण्याही यावेळी नोंदविण्यात आल्या. रास्ता रोकोत आनंदा नागपुरे, महिपाल प्रधान, अरुण यादव, संदीप गोधने, मोहन ढोरे, मुलराज सोमवंशी, गणपत काकडे, प्रदीप लांडगे, ब्रिजेश शुक्ला, मोतीराम गावंडे, रामकिसन काकानी, सदाशिव देशपांडे, नितीन मोरघडे, गोविंद राठोड, सुरेश डुकरे, सचिन मोरघडे, जे.के. कोठडिया, वसंता दोंदल, अरविंद हटवार, विनय पाटील, किरणताई बोरकर, विजय पाटील, मारोतराव मंदिलवार, फत्तेअली सेठ आदी सहभागी झाले होते. (वार्ताहर)