बोरीअरब येथे रास्ता रोको

By Admin | Updated: August 2, 2015 02:25 IST2015-08-02T02:25:08+5:302015-08-02T02:25:08+5:30

दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील एका हनुमान मंदिरातील मूर्तीची विटंबना केल्याची घटना शनिवारी सकाळी ६ वाजता उघडकीस आली.

Stop the road at Boreirab | बोरीअरब येथे रास्ता रोको

बोरीअरब येथे रास्ता रोको

मूर्तीची विटंबना : पालकमंत्र्यांची घटनास्थळाला भेट
बोरीअरब : दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील एका हनुमान मंदिरातील मूर्तीची विटंबना केल्याची घटना शनिवारी सकाळी ६ वाजता उघडकीस आली. या प्रकाराने संतप्त झालेल्या नागरिकांनी यवतमाळ-दारव्हा मार्गावर तासभर रास्ता रोको केला.
मूर्तीची विटंबना झाल्याची घटना उघडकीस येताच पोलीस पाटलाने लाडखेड पोलीस ठाण्यात माहिती दिली. या घटनेची माहिती होताच गावकऱ्यांनीही मोठी गर्दी केली. श्वान पथकाला पाचारण करण्याची मागणी केली. ठाणेदार अनिल राऊत घटनास्थळी दाखल झाले. मात्र नागरिक संतप्त झाले. त्यांनी यवतमाळ-दारव्हा मार्गावर तासभर रस्ता रोको आंदोलन केले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून दारव्हाच्या उपविभागीय अधिकारी कल्पना भराडे, दारव्हाचे ठाणेदार मानकर पोलीस पथकासह दाखल झाले. त्याच दरम्यान यवतमाळवरून श्वान पथक गावात आले. त्यामुळे रस्ता रोको मागे घेवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
श्वानाने मंदिरापासून काही अंतरापर्यंत माग दाखविला. त्यानंतर श्वान घुटमळले. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. दरम्यान, दुपारी २ वाजता पालकमंत्री संजय राठोड, आमदार माणिकराव ठाकरे, आमदार संदीप बाजोरिया, जिल्हा परिषद सभापती सुभाष ठोकळ यांनी घटनास्थळाला भेट देवून परिस्थितीची माहिती घेतली. सायंकाळपर्यंत लाडखेड व दारव्हा पोलीस घटनास्थळी तळ ठोकून होते. (वार्ताहर)

Web Title: Stop the road at Boreirab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.