मायक्रो फायनान्स कंपन्यांची वसुली थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST2020-03-24T05:00:00+5:302020-03-24T05:00:16+5:30

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाउन व जमावबंदीचे आदेश दिले असतानाही मायक्रो फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी जिल्ह्यात दर दिवसाला हजारो महिलांना एकत्रित करून सक्तीची वसुली करीत आहेत. या मायक्रो फायनान्स कंपनीच्या सक्तीमुळे महिला एकत्रित येत आहे

Stop the collections of microfinance companies | मायक्रो फायनान्स कंपन्यांची वसुली थांबवा

मायक्रो फायनान्स कंपन्यांची वसुली थांबवा

ठळक मुद्देशेकडो महिला एकत्र : मनसेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : जिल्ह्यात कोरोना रोगाचा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लॉकडाउन व कलम १४४ लागू केली असतानाही मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून सरकारचे सर्व नियम धाब्यावर बसविले जात आहे. दररोज शेकडो महिलांना एकत्र करून या कंपन्या कर्ज वसुली करत असल्याने या कंपन्यांची वसुली काही काळापुरती थांबविण्याची मागणी मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाउन व जमावबंदीचे आदेश दिले असतानाही मायक्रो फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी जिल्ह्यात दर दिवसाला हजारो महिलांना एकत्रित करून सक्तीची वसुली करीत आहेत. या मायक्रो फायनान्स कंपनीच्या सक्तीमुळे महिला एकत्रित येत आहे. त्यामुळे या रोगाचा प्रसार होऊन विषाणू संसर्गबाधित रूग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या मायक्रो फायनान्सकडून जिल्ह्यात कलम १४४ चे सर्रास उल्लंघन होत आहे. जिल्ह्यात १४४ कलम लागू असताना व या रोगाच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी ग्रामीण भागातील मजूर वर्गाला मजुरी मिळत नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, हा प्रश्न मजूर वर्गाला पडला आहे. त्यात या मायक्रो फायनान्स कंपनीचे कर्मचारी धाकदपट करून सक्तीची वसुली करीत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला वर्ग प्रचंड मानसिक तणावाखाली असल्याचे दिसून येत आहे. आपण या मायक्रो फायनान्स कंपन्यांना काही काळापुरती वसुली थांबविण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी राजू उंबरकर यांनी केली जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.

Web Title: Stop the collections of microfinance companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार