शहरं
Join us  
Trending Stories
1
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
2
डॉक्टर जावयाने स्किन स्पेशलिस्ट लेकीला संपवलं; वडिलांचा मोठा निर्णय, ३ कोटीचं घर केलं दान
3
३ महिन्यांमध्ये १००० कोटी रुपयांचा फायदा; चांदीच्या किमतीनं 'यांना' केलं मालामाल
4
Video - अग्निकल्लोळ! गरीब रथ एक्स्प्रेसला भीषण आग; डबा जळून खाक, प्रवाशांना वाचवण्यात यश
5
जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीने केला महिलेवर ॲसिड हल्ला, तीन महिन्यांपूर्वी दाखल केला होता गुन्हा
6
मनसेला सोबत घेण्याचा प्रस्ताव दिलेलाच नाही! राऊतांचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले, "अजून ते स्वातंत्र्य चळवळीच्या काळातच"
7
अतिवृष्टीने खरीप गेला; रब्बीचा हंगाम देणार हात; धरणे, विहिरी तुडुंब भरल्याने यंदा पेरा ६५ लाख हेक्टरवर जाणार 
8
धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं फायदेशीर ठरेल का, तेजी कायम राहिल? तज्ज्ञांचं म्हणणं काय?
9
७.५ कोटी कॅश, २.५ किलो सोनं, मर्सिडीज... 'भ्रष्ट' IPS अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड
10
‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 
11
काहीतरी मोठं घडणारे... सोन्याच्या किमतीतील तेजीमुळे ही कसली भीती? दिग्गज अर्थतज्ज्ञानं दिला इशारा
12
काय सत्य अन् काय स्वप्न! गूढ वाढवणारा 'असंभव' सिनेमाचा टीझर पाहिलात का?
13
'ट्रेनमध्ये टाईम बॉम्ब लावलाय...', ऐकताच प्रवाशांमध्ये उडाली खळबळ; पोलिसांनी तपास करताच समोर आलं भलतंच कांड!
14
"महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल; तोपर्यंत सर्वांनी सबुरीने घ्या!"
15
Pakistan-Afghanistan War : युद्धविराम होऊनही पाकिस्तानकडून पक्तिका प्रांतात हल्ला; ३ अफगाण क्रिकेटपटू ठार
16
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ओकली गरळ; अफगाणिस्तान भारताच्या हातात म्हणत संबंध तोडण्याची घोषणा!
17
'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया
18
समीर वानखेडेप्रकरणी न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे
19
रोहिणी हट्टंगडी साकारणार पूर्णा आजींची भूमिका; ज्योती चांदेकरांबद्दल म्हणाल्या, "तिच्यासोबत मी..."
20
रबाळेत सुगंधी उत्पादनांचा कारखाना आगीत खाक, ७० कामगार बचावले

पुसदमध्ये राष्ट्रवादीच्या आमदाराच्या वाहनावर काँग्रेस कार्यकर्त्याकडून दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 21:22 IST

आचारसंहिता लागण्याच्या भीतीने पुसद नगरपरिषदेने विकास कामांच्या भूमिपूजनाचा सपाटा सुरू केला आहे.

पुसद (यवतमाळ) -  आचारसंहिता लागण्याच्या भीतीने पुसद नगरपरिषदेने विकास कामांच्या भूमिपूजनाचा सपाटा सुरू केला आहे. शनिवारी याच भूमिपूजनादरम्यान काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे येथील आमदार मनोहरराव नाईक यांच्या वाहनावर दगडफेक केल्याची घटना घडली. या घटनेबाबत राष्ट्रवादीकडून पोलिसात तक्रार नोंदविली गेली नाही किंवा कोणतीही प्रतिक्रिया दिली गेली नाही. दरम्यान, आमदार मनोहरराव नाईक यांनी मात्र हे वृत्त फेटाळून लावले आहे.पुसद नगरपरिषदेने सुमारे दहा कोटींच्या कामांचे भूमिपूजन हाती घेतले. बहुतांश ठिकाणी फलक लावणे व रिबीन कापणे हाच कार्यक्रम सुरू होता. शनिवारी सकाळी काँक्रिट रस्त्याच्या भूमिपूजनासाठी आमदार मनोहरराव नाईक, पुसदच्या नगराध्यक्ष अनिताताई नाईक, मुख्याधिकारी, नगरसेवक पुसदमधील गढी वॉर्डामध्ये पोहोचले. तेथे कामाचे भूमिपूजन व फलकाचे अनावरण केले जाणार होते. सर्व पदाधिकारी या कार्यक्रमस्थळी उपस्थित झाले असताना जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव सैयद इस्तेयाक (पुसद) हे साथीदारांसह तेथे दाखल झाले. एकाच रस्त्याचे कितीवेळा भूमिपूजन करणार, पब्लिक को चॉकलेट दे रहे क्या, या भूमिपूजनासाठी काँग्रेसचे पुसदमधील विधान परिषद सदस्य डॉ. वजाहत मिर्झा यांना का बोलाविले नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी शिवीगाळ करून आमदार मनोहरराव नाईक यांच्या रिकाम्या असलेल्या वाहनावर दगडफेक केली व बुक्क्या मारल्याचे सांगितले जाते.उपस्थित नगरसेवकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही शिवीगाळ करीत त्यांच्यावर चालून जाण्याचा प्रयत्न केला. या घटनेने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. सूत्रानुसार, गढी वॉर्डातील या रस्त्याचे आठ महिन्यांपूर्वी कंत्राट दिले गेले होते. मात्र कंत्राटदाराने प्रत्यक्ष काम न केल्याने पुन्हा निविदा बोलाविल्या गेल्या. याप्रकरणी आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्याशी संपर्क केला असता अशी कोणतीही घटना घडलेली नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. तर पुसद शहर ठाण्यात अशा प्रकारच्या कोणत्याही घटनेची तक्रार अद्याप प्राप्त झाली नसल्याचे ठाणेदार प्रमेश आत्राम यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी आमदार मनोहरराव नाईक यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.कोटहोय, आम्ही कार्यक्रमस्थळी असताना इकडे आमदारांच्या वाहनावर दगडफेक करून बुक्क्या मारल्याची घटना घडली. मी स्वत: त्या पदाधिकाºयाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने मलाच शिवीगाळ केली. जबाबदार पदाधिकाºयाने हा तमाशा का केला, हे न समजण्यापलीकडे आहे. मात्र हा प्रकार निंदनीय आहे.- डॉ. मोहम्मद नदीम, गटनेता, नगरपरिषद पुसद तथा सरचिटणीस, प्रदेश काँग्रेस.

 

शनिवारी सायंकाळी ४.४५ वाजता एकाच कामाचे चौथ्यांदा भूमिपूजन सुरू होते. त्याबाबत आमदार मनोहरराव नाईक यांना जाब विचारला. मात्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. मोहम्मद नदीम यांनी धमकाविल्याने काँग्रेसचे आमदार डॉ. वजाहत मिर्झा समर्थक संतापले. त्यातूनच समर्थकांनी हाती दगड घेतले असता आमदार नाईक, नगराध्यक्ष व डॉ. नदीम पळून गेले. त्यांनी गाडीतच नारळ फोडून भूमिपूजन केले. त्यामुळे गोंधळ संपला.

- सैयद इस्तेयाक, सचिव, जिल्हा काँग्रेस कमिटी, यवतमाळ

टॅग्स :YavatmalयवतमाळNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस