भीमकुंड येथील शाळेला अद्याप कुलूपच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 22:11 IST2019-07-03T22:10:51+5:302019-07-03T22:11:10+5:30

घाटंजी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या भीमकुंड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला अद्यापही कुलूपच आहे. शाळा सुरू झाल्यानंतरही विद्यार्थी शिक्षकाअभावी वºहांड्यात बसत आहे.

Still in the school at Bhimkund, the polelock | भीमकुंड येथील शाळेला अद्याप कुलूपच

भीमकुंड येथील शाळेला अद्याप कुलूपच

ठळक मुद्देशिक्षक नाही : व्हरांड्यातच बसतात मुले, पालकांमध्ये संतापाची भावना, प्रशासनाचे दुर्लक्ष

अब्दूल मतीन ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पारवा : घाटंजी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या भीमकुंड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला अद्यापही कुलूपच आहे. शाळा सुरू झाल्यानंतरही विद्यार्थी शिक्षकाअभावी वºहांड्यात बसत आहे.
भीमकुंड येथे जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंतची शाळा आहे. या शाळेत २२ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. गेल्या २६ जूनला यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झाल्या. मात्र आठ दिवसानंतरही भीमकुंड येथील शाळेचे कुलूप उघडले गेले नाही. दररोज विद्यार्थी शाळेत येतात. मात्र कुलूप बंद असल्याने ते निराश होतात. काही वेळ व्हरांड्यात बसून घरी निघून जातात. या शाळेवर एकही शिक्षक आला नाही. पालकांनी याबाबत पंचायत समिती व केंद्र प्रमुखांना माहिती दिली. मात्र प्रशासनाने अद्यापही लक्ष दिले नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गेल्या वर्षी येथे पंचायत समितीने शिक्षकांची नियुक्ती केली होती. मात्र संबंधित शिक्षक बदली होऊन गेले. त्यानंतर सगदा, सावरगाव, ठाणेगाव येथील शिक्षकांना भीमकुंड शाळेवर आठ-आठ दिवसांसाठी प्रतिनियुक्ती देण्यात आली. मात्र या शैक्षणिक सत्रात अद्याप येथे कोणत्याही शिक्षकाची नियुक्ती झाली नाही. त्यामुळे शाळेला कुलूप लागले आहे.
भवितव्य टांगणीला
भीमकुंड शाळेत पहिली ते चौथीपर्यंत २२ विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र त्यांना शिकविण्यासाठी एकही शिक्षक नाही. चौथीच्या विद्यार्थ्यांना धड १०० पर्यंत पाढा येत नाही. अशाही परिस्थितीत तेथे शिक्षकाची नियुक्ती करण्यास प्रशासन चालढकल करीत आहे. यामुळे पालकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिक्षकाची त्वरित नियुक्ती न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.

Web Title: Still in the school at Bhimkund, the polelock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.